Alka Kubal: ‘शरीरप्रदर्शन करायची माझी तयारी… ‘; अलका कुबल यांनी स्पष्टच सांगितलं

Alka Kubal: ‘शरीरप्रदर्शन करायची माझी तयारी… ‘; अलका कुबल यांनी स्पष्टच सांगितलं

Alka Kubal: आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (Alka Kubal). गेल्या अनेक वर्षांपासून अलका कुबल मराठी सिनेइंडस्ट्रीवर (Marathi cinema industry) राज्य करत आहेत. खरे तर माहेरची साडी (Maherchi Sadi) या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने मोठी ओळख मिळाली.

आदर्श, सोशिक सून अशी त्यांची चाहत्यांमध्ये एक वेगळी इमेज तयार झाली. माहेरची साडी हा चित्रपटात गाजल्यानंतर त्यांच्याकडे अनेक मोठ्या हिंदी, मराठी चित्रपटांचे ऑफर्स आले होते. मात्र, त्यांनी अनेक दर्जेदार हिंदी चित्रपटांना नकार दिला. या पाठीमागचे कारण, त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. १९९१ मध्ये ‘माहेरची साडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)


हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की अलका कुबल यांच्याकडे चित्रपटांच्या चांगलंच रांगा लागले. अलका यांनी या चित्रपटनंतर अनेक मराठी चित्रपट केले. मात्र, त्यांनी बॉलिवूडमधून ऑफर येत असताना देखील त्या नाकारले आहेत. या पाठीमागचे कारण त्यांनी ललिता ताम्हणे यांना सांगितले आहे. ललिता ताम्हणे यांच्या चंदेरी सोनेरी या पुस्तकामध्ये याविषयीचा उल्लेखही आहे.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

‘या’ कारणामुळे दिला हिंदी चित्रपटांना नकार 

”माहेरची साडी’ या चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स मिळाले आहे. पण, मी ठामपणे या सगळ्यांना नकार दिले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. फक्त धार या हिंदी चित्रपटात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली असल्याचे त्यांनी याचवेळी सांगितले आहे. यामध्ये एका पत्रकार मुलीची भूमिका वठवली होती. ही भूमिका चित्रपटाच्या दृष्टीने महत्त्वाची होती.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

या चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या एका सह कलाकाराच्या ओळखीचा होता. यामुळे नाइलाजाने मला तो चित्रपट करावा लागला होता”, असं अलका कुबल यांनी स्पष्ट केले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, कोणत्याही चित्रपटाची निवड करत असताना मी त्याची लांबी बघत नाही. तर, माझी भूमिका किती महत्त्वाची आहे ते बघत असते. पण, हिंदी चित्रपटांसाठी वाट्टेल तसे ड्रेस घालण्याची किंवा शरीरप्रदर्शन करायची माझी अजिबात तयारी नव्हती.

तसंच हिंदी चित्रपटानंमध्ये छोट्या भूमिका करण्यापेक्षा मराठी चित्रपटात नायिका म्हणून मध्यवर्ती भूमिका करणे केव्हाही चांगले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अलका कुबल यांनी नया जहर या हिंदी चित्रपटात देखील काम केलं होतं. मात्र, हा चित्रपट फारसा चालला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube