Bigg Boss Marathi: अमृता खानविलकर अन् अमेय वाघने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी केली रिव्हील

Bigg Boss Marathi: अमृता खानविलकर अन् अमेय वाघने ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी केली रिव्हील

Bigg Boss Marathi Season 5 Day 69 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात आता खऱ्या अर्थाने खेळात रंगत आली आहे. (Bigg Boss Marathi) सदस्यांमध्ये आता अटीतटीची लढाई सुरू आहे. (Bigg Boss Marathi Season 5 Promo) नेहमीप्रमाणे या पर्वाच्या ट्रॉफीने देखील ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”स्वागत करुया अमेय वाघ (Amey Wagh) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) यांचं”. पुढे अमेय आणि अमृता ‘बिग बॉस मराठी’ची या पर्वातील ट्रॉफी रिव्हील करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील ट्रॉफीने सर्वांचंचं लक्ष वेधून घेतलं आहे. डोळे दिपवणारी अशी ही ट्रॉफी आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या मानाच्या ट्रॉफीवर सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता प्रभू-वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर, यांच्यापैकी एकजण मानाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.

Bigg Boss Marathi Grand Finale : कोण ठरणार ‘या’ पर्वाचा महाविजेता ?

‘या’ कलाकारांनी दिली घराला भेट

कलर्स मराठीवरील आगामी चित्रपट ‘लाईक आणि सब्सस्क्राईब’ या चित्रपटातील कलाकार अमेय वाघ, अमृता खानविलकर यांनी बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना भेट दिली. अमेय वाघ चित्रपटाबद्दल म्हणाला, “‘लाईक आणि सब्सस्क्राईब’ नावाचा आमचा सिनेमा आहे. ह्या चित्रपटाचे कथानक असे आहे की आपल्याला माहित आहे की हल्ली लोक इन्फल्यून्सर, कॉन्टेट क्रियेटर, व्लॉगर असतात तर एक व्लॉगर असते आपल्याला अस दिसत की तिच्या व्लॉगमध्ये एक खरी डेडबॉडी आहे आणि ती व्हिडीओमध्ये सापडली आहे की तिने खरोखरचं डेडबॉडी सोबत व्हिडीओ बनवला आहे आणि या कथानकापासून स्टोरी सुरु होते आणि त्यात पात्र गुंफली जातात असा आमच्या चित्रपट आहे.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube