नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! ‘तुम्हें आयने की जरुरत नहीं’, अमृता फडणवीसांचं नवीन गाणं चर्चेत

  • Written By: Published:
नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! ‘तुम्हें आयने की जरुरत नहीं’, अमृता फडणवीसांचं नवीन गाणं चर्चेत

Amruta fadnavis New Song: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) या कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. कधी त्यांची गाणी प्रदर्शित होतात तर कधी सोशल मीडियावरील पोस्टस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत असतात. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. “तुम्हें आईने की जरुरत नहीं” (Tumhein Aaine Ki) असं या गाण्याचे बोल आहेत. त्यांच्या या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.


सोशल मीडियावर गाण्याची लिंक शेअर : या गाण्याची लिंक अमृता यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे. ‘अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न करणारे तुम्हे आईने की जरुरत नही हे माझे गाणे प्रदर्शित झाले आहे’ असे अमृता यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे. सोबतच यूट्यूबची लिंक देखील शेअर केली आहे.

मोठा चाहतावर्ग: सोशल मीडियावर अमृता यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर ते चाहत्यांच्या भेटीला आले असून त्यांनी अमृता यांचे तोंडभरून कौतुक केले जात आहे. सध्या अमृता यांच्या गाण्याची सगळीकडे चर्चा होत असल्याचे दिसत आहे.

Masterchef India 2: ज्यूसचे दुकान चालवणारा मोहम्मद आशिक ठरला विजेता, जिंकले लाखो रुपये

अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या जोरदार चर्चेत असतात. आता त्यांचे ‘तुम्हे आईने की जरुरत नही’ हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या अगोदर देखील त्यांची काही गाणी चाहत्यांच्या भेटीला आली होती. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ त्यांच्या या धमाकेदार गाण्यांना चांगली लोकप्रियता मिळाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube