Amruta Khanvilkar: अभिनेत्रीला मिळाले अनंत-राधिकाच्या लग्नाचं खास निमंत्रण !

Amruta Khanvilkar: अभिनेत्रीला मिळाले अनंत-राधिकाच्या लग्नाचं खास निमंत्रण !

Amruta Khanvilkar Special Invitation: हिंदी-मराठी इंडस्ट्रीत जोरदार चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ! 2024 वर्षात अमृता अनेक बॉलीवूड (Bollywood) प्रोजेक्ट्समधून दिसणार असून आगामी वर्षात ती अनेक नवनवीन भूमिका साकारणार आहे. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे (Social Media) ती म्हणजे अंबानी यांच्या लग्न सराईची अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिला अंबानी कुटुंबाकडून या लग्नसोहळ्याचं विशेष (Wedding Ceremony) निमंत्रण देखील आल्याचं कळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony LIV (@sonylivindia)


अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. अंबानी कुटुंबातील वंशज एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत 12 जुलै दिवशी मुंबईत लग्न करणार आहेत. अंबानी कुटुंबाने याआधीच दोन प्री-वेडिंग इव्हेंट्सचे आयोजन केले आहे, दोन्ही अनेक दिवसांचे उत्सव साजरा करण्यात आले होते. पहिला जामनगरमधील तीन दिवसांचा बॅश होता ज्यात बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग यांनी हजेरी लावली होती, तर दुसरी भूमध्यसागर ओलांडून थांबलेली लक्झरी क्रूझ होती.

यानंतर त्यांनी लग्नाआधीचे सोहळा म्हणून संगीत कार्यक्रम आणि मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. तसेच आता या दोघांच्या लग्न पत्रिका प्रेक्षक कलाकारांच्या घरोघरी पोहचल्या आहेत. तसेच या लग्नाचे खास आमंत्रण मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरला देखील गेले आहे. अमृताने या लग्न पत्रिकेची झलक आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर दाखवली आहे.

रेड गाऊनमध्ये Amruta Khanvilkar च्या अदा; पाहा चाहत्यांना घायाळ करणारे फोटो

अभिनेत्रीने तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आता ती या लग्न सोहळ्यात सहभागी होणार का? ही उत्सुकता सगळ्यांना आहे. राधिका आणि अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा 12 ते 15 जुलै रोजी संपन्न होणार असून अनेक मोठे कलाकार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राधिका आणि अनंत अंबानी यांच्या बिग फॅट वेडिंगच्या चर्चा सगळीकडे सुरू असून अमृता देखील या लग्नाचा भाग होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज