Tripri Dimri: रणबीरसोबत बोल्ड सीन्सबद्दल अखेर अभिनेत्रीने सांगितलं; म्हणाली, ‘भविष्यातही हे करायला…’

Tripri Dimri: रणबीरसोबत बोल्ड सीन्सबद्दल अखेर अभिनेत्रीने सांगितलं; म्हणाली, ‘भविष्यातही हे करायला…’

Tripri Dimri On Working With Ranbir: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अ‍ॅनिमल’ (Animal Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये, रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी (Tripri Dimri ) यांच्यात चित्रित केलेल्या इंटिमेट सीनचीही जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूपचं आवडली आहे. सोबतच तृप्ती डिमरीच्या रणबीरसोबतच्या कामाचेही तोंडभरून कौतुक केल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)


आता अॅनिमल अभिनेत्रीने रणबीर कपूरसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे. अलीकडेच, एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री तृप्तीने रणबीरबद्दल सांगितले आहे की, प्रत्येकजण इतका प्रतिभावान नाही. त्याला ही खास भेट आहे. रणबीरही त्याच्या कामाशी खूप प्रामाणिक आहे. मला त्याचा बर्फी हा चित्रपटही खूप आवडला.

तिला पुढे काही प्रश्न विचारण्यात आले की, तिला भविष्यात रणबीर कपूरसोबतही काम करायला आवडेल का? तर यावर उत्तर देताना तृप्ती म्हणाली की, ‘कोणत्या अभिनेत्रीला रणबीर कपूरसोबत काम करायला आवडणार नाही, त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळत असते. पडद्यावर लोक ज्याप्रकारे आमची केमिस्ट्री भभरून प्रेम देत आहेत. मला आशा आहे की, भविष्यात मला त्याच्यासोबत आणखी काम करायला नक्कीच आवडणार आहे.

Ranbir Kapoor च्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे वाटतात; असं का म्हणाले दिग्दर्शन वांगा?

झोयाची व्यक्तिरेखा साकारून तिने चित्रपटावर वर्चस्व गाजवले आहे. या चित्रपटात तृप्ती दिमरीची भलेही छोटीशी भूमिका असेल, पण त्या काळात तिने रणबीरसोबत बोल्ड सीन्स देऊन चाहत्यांना घायाळ केले आहे. अॅनिमल सुपरहिट झाल्यानंतर तृप्ती डिमरी आता आगामी प्रोजेक्ट्सची वाट बघत आहे. फिल्मीबीटच्या रिपोर्टनुसार, तिला टॉलीवूड इंडस्ट्रीकडून अनेक मोठ्या ऑफर्स मिळत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube