‘भूमिका’ नाटकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; झी 24 तासचा सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार प्राप्त
Bhumika नाटकाला 'माझा स्पेशल पुरस्कारानंतर झी 24 तासचा सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकाने पटकावला आहे.

Another prestigious award for the play ‘Bhumika’; Receives Zee 24 Taas Best Play Award : प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘भूमिका’ या नाटकाला नुकतंच ‘माझा स्पेशल पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले. या सन्मानानंतर या नाटकाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. झी 24 तासचा सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ या नाटकाने पटकावला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अभिनेत्री निवेदिता सराफ, झी सिनेमाचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर, निर्माते अजित भुरे यांच्या हस्ते हा सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला.
‘भूमिका’ या नाटकाला मिळणारा हा प्रतिसाद आमच्यासाठी सुखवणारा आहे अशी भावना व्यक्त करत या पुरस्काराबद्दल नाटकाच्या टीमने कृतज्ञता व्यक्त केली. झी २४ तासचे चॅनेल हेड कमलेश सुतार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार नाटकाचे दिग्दर्शक -चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री समिधा गुरू, निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी यावेळी मानले.
सांगली जिल्हा बँक नोकर भरतीत जयंत पाटलांना झटका, फडणवीसांकडून स्थगिती देत नव्याने भरतीचे निर्देश
‘भूमिका’ घेणं ही आजकाल दुर्मीळ झालेली गोष्ट या नाटकात ठामपणे दाखवली आहे.क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. सचिन खेडेकर, समिधा गुरु, अतुल महाजन, सुयश झुंजूरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर यांच्या या नाटकात भूमिका आहेत.