सचिन जगताप साकारणार मुख्यमंत्री! सन टीव्हीच्या माध्यामातून मालिका क्षेत्रात करणार पदार्पण
Sachin Jagtap यांनी विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. त्यानंतर आता इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली.

Sachin Jagtap to play Chief Minister! He will make his debut in the serial field through Sun TV : अहिल्यानगर येथील बहुचर्चित व्यक्तिमत्व असलेले अॅडव्होकेट सचिनभाऊ अरूणकाका जगताप यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवलेली आहे. त्यानंतर त्यांनी आता अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. सन टीव्ही या लोकप्रिय वाहिनीवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत सचिन भाऊ जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली आहे.या माध्यमातून त्यांनी मालिकाक्षेत्रात पदार्पण केलं आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार,उच्च स्तरीय चौकशीसाठी फडणवीसांची भेट; पडळकर आक्रमक
दरम्यान सध्या सण मराठी या वाहिनीवरील इन्स्पेक्टर मंजू या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे. वाघोबा प्रोडक्शनची ही मालिका असून प्रसिद्ध निर्माते तेजपाल वाघ, सरोज वाघ हे या मालिकेचे निर्माते आहेत. त्याचबरोबर या मालिकेमध्ये मोनिका राठी, वैभव कदम, विद्या सावळे, अजय तापकिरे या कलाकारांनी आपल्या अभिनयाद्वारे मालिकेला एक उच्च पातळी गाठून दिली आहे.
त्यानंतर आता या मालिकेत अहिल्यानगर येथील सचिन भाऊ जगताप हे देखील अभिनय साकारणार असल्याने यामध्ये आणखी लागणार आहेत. या मालिकेमध्ये ते मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणार आहे. ही मालिका सन मराठीवर रात्री आठ वाजता प्रसारित होते. तर सचिन जगताप हे या मालिकेमध्ये सात ते 10 ऑक्टोबर आणि तेथून पुढील सर्व एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहेत.
Breaking News! विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात! दोन दिवसांपूर्वीच झाला रश्मिका मंदानाशी साखरपुडा
सचिन जगताप यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले आहे, अरुणोदय एजे प्रोडक्शनच्या माध्यमातून ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपलं योगदान देतात. नगर हे चित्रपट निर्मितीचे हब करण्याचा त्यांचा मानस आहे. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अरुणोदय फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांनी नगरकरांना जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याचा व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. ते आमदार संग्राम जगताप यांचे मोठे बंधू आहेत.