स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या अस्थींचे गंगेत विधिवत विसर्जन

आपल्या अद्वितीय आवाजाने समृद्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या इच्छेनुसार आज त्यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन करण्यात आले.

  • Written By: Published:
Untitled Design (5)

Asha Bhosle’s ashes duly immersed in the Ganges : भारतीय संगीतविश्वाला आपल्या अद्वितीय आवाजाने समृद्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या इच्छेनुसार आज त्यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर नवव्या दिवशी हा भावनिक आणि पारंपरिक विधी वाराणसी येथे पार पडला. आज सकाळी वाराणसीतील नमो घाट येथून अत्यंत भावपूर्ण वातावरणात अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या बोटीत आशाताईंचे छायाचित्र ठेवण्यात आले होते, तर पार्श्वभूमीला त्यांच्या अमर गाण्यांचे मंद स्वर वातावरण भारून टाकत होते. मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या साक्षीने ही बोट हळूहळू मणिकर्णिका घाट कडे रवाना झाली.

जपान हादरलं! सानरिकू किनाऱ्याजवळ समुद्रात 7.5 तीव्रतेचा भूकंप; किनारपट्टी भागात अलर्ट जारी

या प्रवासादरम्यान नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) च्या जवानांनी जलमार्गावर मानवंदना देत उपस्थिती लावली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच गंभीर आणि आदरयुक्त झाले. घाटावर पोहोचल्यानंतर त्यांच्या चिरंजीव आनंद भोसले यांनी विधिवत पिंडदान करून अस्थिविसर्जनाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी कुटुंबीयांमध्ये त्यांची पत्नी अनुजा भोसले आणि मुलगी जनाई भोसले उपस्थित होत्या. तसेच आशाताईंना अखेरपर्यंत साथ देणारे भाऊ आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, योगेश खडिकर, स्थानिक आमदार अवध्येश सिंह यांच्यासह ‘जीवनगाणी’ मित्रपरिवारातील सदस्यांनीही या अंतिम विधीत सहभाग घेतला.

संगीताच्या प्रत्येक स्वरात जीवनाचे रंग भरून टाकणाऱ्या आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या गाण्यांचा अनमोल ठेवा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.

follow us