चित्रपट निर्मिती उद्योगाला मिळणार चालना, लागू होणार एक खिडकी योजना

  • Written By: Published:
चित्रपट निर्मिती उद्योगाला मिळणार चालना, लागू होणार एक खिडकी योजना

Ashish Shelar : चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, महाराष्ट्रात जास्तीत जास्त चित्रपटांंची निर्मिती व्हावी,त्यातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणाच्या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे व सुसुत्रता असावी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना लागू करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज विभागाला दिले.

सांस्कृतिक कार्य विभाग हे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य करते. त्यामुळे या विभागाचे काम करत असताना आवश्यक त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर, उपसचिव महेश वाव्हळ, उपसचिव नंदा राऊत, अवर सचिव बाळासाहेब सावंत, अवर सचिव परसराम बहुरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, दर्शनिका विभागाचे संपादक डॉ.दिलीप बळसेकर, पु.ल.अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षणचे सचिव संतोष खामकर, राज्य साहित्य अकादमीचे सहसंचालक सचिन निंबाळकर, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले आदी उपस्थित होते.

आपलं कोण परकं कोण? म्हणत निक्की- अरबाजवर छोटा पुढारी भडकला

या बैठकीत आगामी 100 दिवसात करावयाच्या उपक्रम, योजना, प्रकल्प, कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करणे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनर्विकास करून उद्घाटन सोहळा आयोजित करणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन करणे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अशा विविध विषयांवर मंत्री ॲड.शेलार यांनी सखोल चर्चा केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube