जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर दोघं होणार वेगळं; फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा डिवॉर्स

जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर दोघं होणार वेगळं; फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा डिवॉर्स

Actor Hugh Jackman and Deborah Lee Furness Divorce : ऑस्ट्रेलियन अभिनेता हग जॅकमन आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री डेबोरा ली फर्नेस यांनी जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर एकमेकांपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे. (Divorce) त्यांनी आता घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2023 मध्येच हे दोघं वेगळे झाले होते. त्यानंतर ते अधिकृतरित्या विभक्त होण्यासाठी प्रक्रिया करत आहेत.

जॅकमन आणि डेबोरा यांनी त्यांच्या मालमत्तेच्या विभाजनाबाबत एक करार केला आहे. ज्यामध्ये तब्बल 387 दशलक्ष डॉलर (जवळपास 3387 कोटी रुपये) संपत्तीचा समावेश आहे. या दोघांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात असून त्यासाठी फक्त न्यायालयीन मंजुरीची आवश्यकता आहे. घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर डेबोराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पहिलं लग्न मग् घटस्फोट; नंतर गर्लफ्रेंडची ;सोशल एन्ट्री’, तेज प्रतापची संपूर्ण कहाणी

विश्वासघाताच्या वेदनादायी प्रवासातून गेलेल्या त्या सर्वांबद्दल माझ्या मनात संवेदना आहेत. ही एक खोलवर झालेली जखम आहे, असं ती म्हणाली आहे. तर, दुसरीकडे जॅकमनने याप्रकरणी मौन बाळगणं पसंत केलं आहे. परंतु, त्याचे ‘म्युझिक मॅन’मधील सहअभिनेत्री सटॉन फॉस्टरसोबत काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे दोघं हातात हात घालून चालताना आणि एकमेकांना किस करताना या फोटोंमध्ये दिसले.

जॅकमन आणि डेबोरा यांना दोन मुलं आहेत. ऑस्कर आणि आवा अशी त्यांची नावं आहेत. तर, जिच्यासोबत जॅकमनच्या अफेअरच्या चर्चा आहेत, त्या सटॉन फॉस्टरने ऑक्टोबर 2024 मध्ये पती टेड ग्रिफिनला घटस्फोट दिला आहे. या दोघांना एक बाळ आहे. टेड हा पटकथालेखक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या