NFDC-NFAI यांच्या विशेष सहकार्याने मोठ्या पडद्यावर पाहता येणार “अवघाचि संसार” चित्रपट

Awghachi Sansar :  महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने दिवाळीच्या

  • Written By: Published:
Awghachi Sansar

Awghachi Sansar :  महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला अवघाचि संसार” चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. एनएफडीसी -एनएफएआय यांच्या विशेष सहकार्याने रसिकाना 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वा. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र लघु नाट्यगृह प्रभादेवी येथे “अवघाचि संसार” या अजरामर चित्रपटाला पुन्हा पाहण्याची सुवर्णंसंधी  मिळणार आहे.

1960 रोजी गाजलेला “अवघाचि संसार ” (Awghachi Sansar) या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन अनंत माने यांनी केले असून अनेक वर्षापूर्वी रसिकांनी चांगली दाद दिली होती. जे वेड मजला लागले, रूपास भाललो मी अशा प्रसिद्ध अजरामर गाणी या चित्रपटात आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकरी (Jayashree Gadkari) व अभिनेते रमेश देव (Ramesh Dev) यांनी प्रमुख भूमिका हा चित्रपटात साकारलेली असून दामू आण्णा मालवणकर, पद्या चव्हाण, राजा गोसावी, शरद तळवणकर यासारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात अभिनय साकारला आहे.

मतदारयाद्यांमध्ये घोळ, यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका; राज ठाकरेंचे अधिकाऱ्यांना घाम फोडणारे प्रश्न

हा चित्रपट मंडळाच्या सभासदासह सर्व रसिकाना विनामूल्य पाहता येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम आसन व्यवस्था असणार आहे.

follow us