‘साबर बोंडा’ ठरला सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील होणारा एकमेव भारतीय चित्रपट!
Sabar Bonda : ‘साबर बोंडा (कॅक्टस पिअर्स)’ची (Sabar Bonda) दक्षिण आशियामधील प्रतिष्ठित सनडान्स फिल्म फेस्टिवलसाठी (Sundance Film Festival) निवड झाली. या फिल्म फेस्टिवलसाठी निवड झालेला हा एकमेव भारतीय चित्रपट (मराठी सिनेमा) ठरला आहे. काल सायंकाळी फेस्टिव्हलसाठी निवड झालेल्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली.
Video : ….तेव्हा मला तोंड लपवावं लागतं; लोकसभेत गंभीर विषयावर बोलताना गडकरींची नाराजी
सनडान्स फिल्म फेस्टिवल हा सनडान्स इन्स्टिट्यूटकडून आयोजित केला जाणारा वार्षिक चित्रपट महोत्सव आहे. हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील सर्वात मोठा स्वतंत्र चित्रपट महोत्सव आहे. यंदा रोहन परशुराम कनावडे दिग्दर्शित ‘साबर बोंडा (कॅक्टस पिअर्स)’ या चित्रपटाची सनडान्स फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली. या फेस्टिव्हपर्यंत पोहोचणार हा पहिलाच मराठी भाषिक चित्रपट ठरला. ‘साबर बोंडा’ हा चित्रपट यंदा फेस्टिवलसाठी मिळालेल्या जगभरातील हजारो सबमिशन्समधून निवडण्यात आलेल्या चित्रपटांसोबत स्पर्धा करणार आहे.
ताहिर राज भसीन यांची ‘ये काली काली आंखें’ च्या सीझन 3 वर प्रतिक्रिया, म्हणाला …
हा चित्रपट शहरात राहणाऱ्या आनंदच्या अवतीभोवती फिरतो, ज्याला वैयक्तिक घुसमट आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागतो. त्याला त्याच्या वडिलोपार्जित गावामध्ये १०-दिवसांचा शोक विधी करावा लागतो. पश्चिम भारतातील खडतर स्थितीमध्ये त्याला त्याच्यासारख्याच सामाजिक ताणे-बाणे सहन करत असलेल्या बालपणीच्या मित्राकडून सांत्वन आणि आधार मिळतो. या चित्रपटामध्ये भूषण मनोज, सुरज सुमन आणि जयश्री जगताप असे प्रतिभावान कलाकार आहेत.
वेनिस बायनेल कॉलेज सिनेमा २०२२-२०२३ आणि एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्पअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या चित्रपटांला आंतराष्ट्रीय पातळीवरील अनेकांनी सहकार्य केलं. नीरज चुरी (यूके), मोहमद खाकी (कॅनडा), कौशिक राय (यूके), नरेन चंदावरकर (भारत), सिद्धार्थ मीर (भारत) आणि हरेश रेड्डीपल्ली (भारत), तसेच सह-निर्माता, प्रतिष्ठित अभिनेता जिम सर्भ आणि सहाय्यक निर्माता राजेश परवटकर यांच्या प्रयत्नातून या चित्रपटाची निर्मिती झाली.
सनडान्ससाठी चित्रपटाची निवड झाल्याने स्वप्न पूर्ण झाले…
या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत मत व्यक्त करतांना लेखक-दिग्दर्शक रोहन परशुराम कनावडे म्हणाले, साबर बोंडा (कॅक्टस पिअस) हा चित्रपट माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित गावामध्ये अनुभवलेल्या दु:खद काळाची आठवण करून देतो. ज्या दरम्यान माझ्यावर विवाहासह सांस्कृतिक अपेक्षांचे पालन करण्याचा मोठा दबाव होता. या वैयक्तिक कथानकाला प्रत्यक्षात आणणे आणि सनडान्समध्ये मान्यता मिळणे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
रोहन कनावडे यांच्याबाबत
रोहन यांना चालक वडिल आणि अशिक्षित गृहिणी असलेली आई यांनी मुंबईतील झोपडपट्टीमधील एका लहान घरामध्ये मोठे केले. त्यांचं शिक्षण इंटीरिअर डिझाइनमध्ये झालं असून त्यांच्या लघुपटांना जागतिक स्तरावर प्रशंसा मिळाली. त्यांचा पहिला चित्रपट ‘साबर बोंडा (कॅक्टस पिअर्स)’ फिल्म लंडन प्रॉडक्शन फायनान्स मार्केट २०२१, एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प २०२१ फिल्म बझार २०२२, वेनिस गॅप फायनान्सिंग मार्केट २०२३ आणि गोज टू केन्स २०२४ चा देखील भाग होता.
निर्मात्यांबाबत
चित्रपट ‘साबर बोंडा’चे निर्माते आहेत नीरज चुरी (लोटस व्हिज्युअल प्रॉडक्शन्स, यूके), मोहमद खाकी (कॅनडा), कौशिक रे (तरण तंत्र टेलिफिल्म्स, यूके), नरेन चंदावरकर (मूनवीव्ह फिल्म्स, भारत), सिद्धार्थ मीर (ब्रिज पोस्टवर्क्स, भारत) आणि हरीश रेड्डीपल्ली (डार्क स्टोरीज, भारत), तसेच सह-निर्माता जिम सर्भ (वंडरफुल एंटरटेन्मेंट, भारत) व सहाय्यक निर्माता राजेश परवटकर (यूके).
प्रमुख श्रेय
दिग्दर्शक व पटकथालेखक
रोहन परशुराम कनावडे
भूषण मनोज
जयश्री जगताप
सूरज सुमन
सिनेमॅटोग्राफर (छायालेखक)
विकास उर्स
एडिटर
आनंदी अॅथले
कलरिस्ट
हिमांशू कांबळे
साऊंड डिझाइनर्स
अनिरबन बार्थकूर आणि नरेन चंदावरकर
कॉश्चूम डिझाइनर
सचिन लोवालेकर