कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरूवात, अभिनेता आयुष्मान खुरानाही हजर

  • Written By: Published:
कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरूवात, अभिनेता आयुष्मान खुरानाही हजर

Republic Day : देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दि (Republic Day) साजरा होत आहे. कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरूवात झाली आहे. यंदा प्रथमच या परेडची सुरूवात 100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्ये वाजवून झाली. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, ख्यातनाम बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा देखील या परेडसाठी उपस्थित आहे.

Haridwar : ‘कॅन्सर’ग्रस्त मुलाला बुडवून मारल्याचा आरोप; पण पोलिसांनी सांगितले वेगळेच सत्य 

26 जानेवारी 1950 रोजी भारताने नवनिर्मित राज्यघटना लागू केली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला. तेव्हापासून भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा होतो. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे कर्तव्य पथावर होणारे लष्करी परेड. प्रजासत्ताक दिनाचे परेड हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्य आणि लष्करी सामर्थ्याचे नेत्रदीपक प्रदर्शन असते. पहिली परेड 1950 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून ती दरवर्षी आयोजित केली जाते.

‘ठाकरेंचे सरकार पडणार होतं तेव्हाच आम्ही सर्वांनी…’; अजित पवारांचा मोठा खुलासा 

या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण सत्ताधारी सरकार, सर्व विरोधी पक्षनेते आणि सर्व संसद सदस्य उपस्थित आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहूणे आहेत.

दरम्यान, आयुष्मान खुराना हा देखील या परेडचा साक्षीदार होण्यासाठी कर्तव्यपथावर गेला आहे. आयुष्मान खुरानाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये बाला, विकी डोनर, ड्रीम गर्ल, शुभमंगलम सावधान, आर्टिकल 15 आणि ड्रीम गर्ल 2 सारख्या यशस्वी चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube