Baahubali: चाहत्यांना मोठं गिफ्ट! प्रभास आणि राजामौली पुन्हा ‘बाहुबली 3’च्या तयारीत
Baahubali 3 Hint: बाहुबली (Baahubali) आणि बाहुबली 2 च्या (Baahubali 2) जबरदस्त यशानंतर, आता पुन्हा एकदा बाहुबली कमबॅक करत आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी आपल्या बाहुबली चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. दिग्दर्शकाने त्याच्या आगामी ‘बाहुबली द क्राउन ऑफ ब्लड’ या (Baahubali The Crown of Blood) नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
When the people of Mahishmati chant his name, no force in the universe can stop him from returning.
Baahubali: Crown of Blood, an animated series trailer, arrives soon! pic.twitter.com/fDJ5FZy6ld
— rajamouli ss (@ssrajamouli) April 30, 2024
निर्माता-दिग्दर्शक राजामौली यांनी काल संध्याकाळी इन्स्टा स्टोरी आणि ट्विटद्वारे त्यांच्या ‘बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड’ या नवीन मालिकेची घोषणा केली. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये या सिनेमाबाबत अपडेट देण्यात आले आहे. या सिनेमाची खास गोष्ट म्हणजे ही सिनेमा पूर्णपणे ॲनिमेटेड असणार आहे. बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लडची झलक शेअर करताना राजामौली यांनी असेही सांगितले की, लवकरच त्याचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे.
व्हिडिओ शेअर
एसएस राजामौली यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर बाहुबलीचे नारे स्पष्टपणे ऐकू येत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना दिग्दर्शकाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा महिष्मतीचे लोक त्यांच्या नावाचा जप करतात, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्यांना परत येण्यापासून रोखू शकत नाही. बाहुबली: क्राउन ऑफ ब्लडचा ट्रेलर, एक ॲनिमेटेड सिनेमा लवकरच येत आहे.
Advait Dadarkar: रमा राघवमध्ये लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एंट्रीचा व्हिडीओ पाहिलंत का?
पहिल्या झलकनंतर चाहत्यांनी प्रश्न विचारले
बाहुबली: क्राउन ऑफ ब्लडच्या घोषणेनंतर, चाहते खूप उत्सुक आहेत आणि त्याची कथा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, या सिनेमाची कथा कशी असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सिनेमाच्या स्टार कास्टबाबत कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडिया यूजर्स कमेंटमध्ये लिहित आहेत, सुपर बाहुबली. एका वापरकर्त्याने विचारले की ते नेटफ्लिक्सवर येणार का? असे प्रश्न सध्या विचारात आहेत.