‘Baipan Bhaari Deva’ अन् राज ठाकरे यांच्या वडिलांचं नेमकं काय आहे कनेक्शन? जाणून घ्या

‘Baipan Bhaari Deva’ अन् राज ठाकरे यांच्या वडिलांचं नेमकं काय आहे कनेक्शन? जाणून घ्या

Baipan Bhaari Deva: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत असल्याचे दिसून येत  आहे. या सिनेमातील गाणी, डायलॉग सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहेत. (Social media) विशेष म्हणजे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) अनेक मराठी सिनेमांचे रेकॉर्ड देखील मोडले आहे.

‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील गाण्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण झाले आहे. नुकतंच त्यांनी या गाण्याच्या गायिकांसाठी केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी एक स्पेशल पोस्ट केली आहे.’ बाईपण भारी देवा’ या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील टायटल साँग, ‘मंगळागौर’ ही गाणी चांगलंच हिट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)


#baipanbhaarideva मध्ये खरतर चार गाणी. त्यातलं टायटल व पिंगा हे कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅट सॅांग आहे.. स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं.. “उघड्या पुन्हा जाहाल्या”. नवॅ गाणं करायचं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं. असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. ते गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी @suvarna_music . कमाल गायलय. आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार? लवकरच.. आणि… शेवटचं गाणं. “मंगळागौर” ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र collage करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात. पण सिनेमात ते गाणं ३-४ मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र @savanieeravindrra कम्माल गायली आहे. त्याची सुरूवातीची आरती ज्या सुकूनने ती गायली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तीचा आवाज घरंदाज वाटतो. सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटर मध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या सिनेमा साठी या सगळ्यांचं योगदान खुप मोठं आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाला सध्या चाहत्यांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने अवघ्या १० दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला कमावला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट सिनेमा ठरला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube