Movie Sequel: 2024 वर्ष अखेरीस बॉलिवूड, हॉलिवूड आणि मराठी ‘या’ सिनेमाचे सिक्वेल होणार रिलीज
Bollywood Hollywood Marathi Cinema Sequel: हिंदीत अलीकडच्या काही वर्षांत यशस्वी झालेले सिनेमे बोटावर मोजण्याइतकेच आहेत. बॉलिवूडला (Bollywood ) सावरण्याची मदार (Marathi Cinema) आता सिनेमांच्या ‘सीक्वेल’ वर (Cinema Sequel) आल्याचं चित्र सध्या मनोरंजन पडद्यावर तयार झालं आहे. दुसरीकडे मराठीच्या पडद्यावरही तीन महत्त्वाकांक्षी सिनेमांचे पुढील भाग येत्या महिन्यांमध्ये, रिलीज होणार आहेत. याला हॉलिवूडच्या (Hollywood ) डझनभर सीक्वेल सिनेमांचीही जोड असल्यानं ‘सारा जमाना ‘सीक्वेल का दीवाना’ असं म्हणायची वेळ सिनेकर्ते आणि प्रेक्षकांवर आली आहे. सीक्वेलच्या रूपानं यशाचा नवा फॉर्म्युला सध्या बॉलिवूडला गवसला आहे. हेच चित्र मराठी सिनेमांच्या सीक्वेलबाबतही आहे. वर्षअखेरीपर्यंत हिंदी-मराठी असे मिळून 20सिनेमांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या शर्यतीत हॉलिवूडही असल्यानं प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
View this post on Instagram
जसं की, 20 वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’, सिंघम अगेन या लोकप्रिय सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर दुसरीकडे 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात सीक्वेलचे संकेत देण्यात आले होते. तो ‘धर्मवीर 2’ येत्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदीमध्ये प्रदर्शित होत आहे. मराठीच्या मोठ्या पडद्यावर वर्षअखेरीस ‘ये रे ये रे पैसा’चं सिनेमॅटिक युनिव्हर्सदेखील प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा 3’चं चित्रीकरण सध्या वेगानं सुरू आहे. प्रेक्षकांची मिळणारा प्रतिसाद, सीक्वेल सिनेमांसाठीची प्रेक्षकांची ताणलेली उत्सुकता, बॉक्स ऑफिसवरील मोठी उलाढाल करताना पाहायला मिळत आहे, सीक्वेलच्या रूपानं यशाचा नवा फॉर्म्युला मनोरंजन सृष्टीला गवसला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
आगामी काळात देखील हे समीकरण अधिकच अधोरेखित होताना पाहायला मिळणार आहे. कारण हिंदी-मराठी मिळून 10 सिनेमांचे सीक्वेल 2024 च्या उर्वरित पाच महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत. यात राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री 2’कडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. यासह रोहित शेट्टीचा बहुप्रतीक्षित ‘सिंघम अगेन’, कार्तिक आर्यनचा ‘भुलभुलैया 3’ आणि ‘पुष्पा 2’चीदेखील शक आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्याचप्रमाणे ‘तारे मुख्य भूमिकेत आहे. ‘सैराट’च्या यशानंतर हिंदीत अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘धडक’ हा हिंदी रिमेक बनवण्यात आला. त्याच सिनेमाच्या शीर्षकाचा धागा पकडून आता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी अभिनित ‘धडक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सिंघम अगेन’ या सिनेमासह अजय पर देवगणच्या एका सिनेमाचा सीक्वेल यंदा प्रदर्शित होणार आहे. तो म्हणजे ‘रेड 2’. हॉलिवूडच्याही दहा सिनेमांचे सीक्वेल प्रदर्शनाच्या रांगेत आहेत, ते पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत.
Bhool Bhulaiya 3: कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3 चे 3 मोठ्या अपडेट्स जाणून घ्या
आगामी हिंदी-मराठी सिनेमांचे सिक्वेल
आगामी हिंदी-मराठी सिनेमांचे सिक्वेल ‘पुष्पा 2’, ‘धर्मवीर 2’, ‘नवरा माझा नवसाचा 2’, ‘ये रे ये रे पैसा 3’, ‘स्त्री 2’, ‘सिंघम अगेन’, ‘भुलभुलैया 3’, ‘रेड 2’, ‘धडक 2’, ‘पुष्पा 2’, ‘सितारे जमीं पर’
हॉलिवूडपटांचे आगामी सीक्वेल
‘एलियन: रोम्युलस (एलियन व्हर्सेस प्रिडेटर फ्रँचाइझी)’, ‘बिटलज्यूस बिटलज्यूस’, ‘ट्रान्सफॉर्मर्स वन’, ‘जोकर : फोली ए डू’, ‘स्माइल 2’, ‘व्हेनॉम: द लास्ट डान्स’, ‘ग्लॅडिएटर 2’, ‘मोआना 2’, ‘सॉनिक : द हेजहॉग 3’, ‘मुफासा : द लायन किंग’