ब्रॅड पिटने दिले ‘हार्ट ऑफ द बीस्ट’च्या कथानकाचे संकेत; म्हणाला, ‘ही एक…
Brad Pitt चा ‘हार्ट ऑफ द बीस्ट’ हा चित्रपट एका सैनिक आणि त्याच्या कुत्र्याच्या संघर्षाची कहाणी मांडणार आहे.
Brad Pitt hints at the plot of ‘Heart of the Beast : हॉलिवूडमधील लोकप्रिय आणि विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता ब्रॅड पिट ‘F1’नंतर आता एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅरामाउंट पिक्चर्सचा आगामी सर्व्हायव्हल थ्रिलर ‘हार्ट ऑफ द बीस्ट’ हा चित्रपट एका सैनिक आणि त्याच्या कुत्र्याच्या संघर्षाची कहाणी मांडणार आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ब्रॅड पिट एका माजी स्पेशल फोर्सेस सैनिकाची भूमिका साकारत आहे. तो आपल्या माजी लष्करी K-9 कुत्र्यासोबत अलास्काच्या दुर्गम आणि धोकादायक प्रदेशातून छोट्या विमानाने प्रवास करत असतो. त्याचा साथीदार ओडिन हा जर्मन शेफर्ड आहे.
मोठी बातमी ! ‘वंदे मातरम्’चा अपमान आता गुन्हा ठरणार; राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून विधेयकाला मंजुरी
मात्र, या प्रवासादरम्यान विमानाचा अपघात होतो आणि पिट व ओडिन अलास्काच्या निर्जन प्रदेशात अडकून पडतात. त्यांच्या समोर जगण्यासाठी संघर्ष करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. ‘हार्ट ऑफ द बीस्ट’च्या माध्यमातून ब्रॅड पिट एका भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच ‘Esquire’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या भूमिकांविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल भाष्य केले.
TET पेपर लीक प्रकरण; सोलापूरमध्ये पोलीस प्रशिक्षण संस्थेचा चालक अटकेत
62 वर्षांच्या पिटला प्रत्येक नव्या भूमिकेत काहीतरी नवीन शोधण्याची इच्छा असते. एखादा पूर्णपणे नवीन अनुभव असो किंवा एखाद्या दृश्यातील सूक्ष्म भावनिक क्षण असो, भूमिकेतून स्वतःला काहीतरी नवीन शिकता किंवा अनुभवता आले, तरी त्याच्यासाठी ते पुरेसे असते. पिटकडे स्वतःचे दोन पाळीव कुत्रे असून त्यांची नावे संडे आणि वॅंडी आहेत. त्यामुळे ‘हार्ट ऑफ द बीस्ट’मधील त्याचे आणि ओडिनचे नाते त्याच्यासाठी विशेष असावे, असे मानले जात आहे.
IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेल अटकेत; लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप
चित्रपटाबद्दल बोलताना पिटने त्याचे वर्णन केवळ ‘एक प्रेमकथा’ असे केले आहे. मात्र, ही पारंपरिक प्रेमकथा नसून जगण्यासाठीच्या संघर्षात एकमेकांची साथ देणाऱ्या दोन साथीदारांची भावनिक कहाणी आहे. संकटाच्या परिस्थितीत कोणताही मार्ग शिल्लक नसताना घ्यावे लागणारे कठीण निर्णय या कथेत पाहायला मिळणार आहेत. ‘हार्ट ऑफ द बीस्ट’च्या निमित्ताने ब्रॅड पिट आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड अयेर पुन्हा एकत्र आले आहेत. यापूर्वी दोघांनी ‘Fury’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही डेव्हिड अयेर यांनी केले होते.
निवडणूक आयोगाला पक्षाची अंतर्गत लोकशाही तपासण्याचा अधिकार आहे का? सिब्बल यांचा सवाल
‘हार्ट ऑफ द बीस्ट’मध्ये ब्रॅड पिटसोबत जे. के. सिमन्स आणि अॅना लॅम्बे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा कॅमेरॉन अलेक्झांडर यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती ऑलिव्हिया हॅमिल्टन, मार्टी बोवेन, डेव्हिड अयेर आणि ब्रॅड पिट यांनी केली आहे. तर डेमियन शॅझेल, स्कॉट लम्पकिन, कॅमेरॉन अलेक्झांडर, ख्रिस लॉन्ग, पीट चियापेट्टा, अँथनी टिटानेग्रो, अँड्र्यू लॅरी, सोफी कॅसिडी आणि झॅक कॉनरॉय हे कार्यकारी निर्माते आहेत.
‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव 2026’ ला अमेरिकन-भारतीय रसिकांची विक्रमी दाद!
पॅरामाउंट पिक्चर्सने डोमेन एंटरटेनमेंट आणि गल्फस्ट्रीम पिक्चर्सच्या सहकार्याने ‘हार्ट ऑफ द बीस्ट’ची निर्मिती केली आहे.ब्रॅड पिट आणि त्याचा जर्मन शेफर्ड साथीदार ओडिन यांच्या जगण्यासाठीच्या थरारक संघर्षाची ही कथा 25 सप्टेंबर 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.