एक रात्र, एक घटना अन् गोंधळ… कॅन्डी अॅन्ड द पिझ्झा गर्लचा धमाकेदार ट्रेलर रीलीज
Candy And The Pizza Ggirl हिंदी चित्रपट Candy And The Pizza Ggirl चा ट्रेलर आज 8 एप्रिल 2026 रोजी रिलीज झाला आहे.
Candy And The Pizza Ggirl Films Trailer Release : हिंदी चित्रपट Candy And The Pizza Ggirl चा ट्रेलर आज 8 एप्रिल 2026 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट मुंबईमध्ये घडलेल्या एका विचित्र, अराजक आणि भयावह पण कॉमेडी अशा पौर्णिमेच्या रात्रीची गोष्ट आहे. डेब्यू दिग्दर्शक अखिल कपूर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; आर्थिक मदत केली जाहीर
ही कथा एका विनाशकारी घटनेपासून सुरू होते. जी एक अराजक घटनांची साखळी निर्माण करते. जस जशी रात्र पुढे जाते तसं तशा वेगवेगळ्या आणि विचित्र पात्रांचं जीवन अनपेक्षित आणि नेहमी अजब पद्धतीने एकमेकांना धडकतात. एक झगमगाटातील वयस्कर पार्टी बॉय ज्याचा वास्तविकतेशी संपर्क कमी असूनही तो स्वत:ला नियंत्रणात असल्याचं मानतो. मात्र त्याच्या हातून सर्व काही निसटत चाललं आहे.
त्यामुळे एक दिखाऊ पण बनावट प्रभाव टाकणारा चुकीच्या जागी त्याची तत्व शोधत आहे. जेथे पिझ्झा गर्ल जी प्रिया बॅनर्जीने साकारली आहे ती असते. जीच्या गु़ढ इच्छा अनेकांची आयुष्यांच्या दिशा बदलवतात. ज्यामध्ये दारा संधूने साकारलेला मिकी हा एक अभिनेता असतो. ज्याला अभिनय आणि वास्तवातील फरक समजत नाहीय. या सर्वांचे मार्ग सनी म्हणजे निमिष शितोळेशी धडकतात. जो एक अस्थिर व्यक्ती असून त्याला एक परफेक्ट काम करायचं आहे. तर पेडलर असलेला अनिकेत सांगावी जो एक ड्रग डिलर असून तो डॉक्टर म्हणून काम करत आहे. जो समाजामध्ये अराजकता पसरवत आहे.
पासपोर्ट सेवा केंद्रामुळे वाहतूक व नागरी समस्या; विनायक निम्हण यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय
हा डार्क कॉमेडी, व्यंग्य आणि मानसोपचार तज्ज्ञांचं अजब मिश्रण आहे. तसेच हा ओळख, भ्रम, अतिरेक आणि नियंत्रण तसेच अराजकतेमधील धुसर रेषा आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी रीलीज होणार आहे.