शिल्पाच्या पतीच्या पॉर्नोग्राफी केसवर येणार चित्रपट; स्वतः राज कुंद्रा साकारणार भूमिका
Raj Kundra Pornography Case : फिटनेस क्विन अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा दोन वर्षांपूर्वी पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकला होता. त्यानंतर त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं. शिल्पा आणि राज यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ मानला जातो. तर आता याच पॉर्नोग्राफी केसवर चित्रपट येणार आहे. ( Coming Film on Shilpa Shetty Husband Raj Kundra Pornography Case )
मणिपूर हिंसाचार अन् महिलांच्या व्हिडिओ प्रकरणावर संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब…
स्वतः राज कुंद्रा साकारणार भूमिका…
शिल्पाच्या पतीच्या पॉर्नोग्राफी केसवर चित्रपट येणार आहे. तर या चित्रपटामध्ये स्वतः राज कुंद्रा भूमिका साकारणार आहे. यामध्ये राज कुंद्रा त्याला पॉर्नोग्राफी केसमध्ये झालेली अटक आणि जेलमधील काही दिवस या पडद्यावर दाखवणार आहे. मात्र या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र स्वतः राज कुंद्रा चित्रपटाच्या प्रोडक्शनपासून स्क्रिप्टींगपर्यंत सर्व गोष्टींमध्ये असणार आहे. लवकरच या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे.
जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना तरुणाचा मृत्यू, पण मृत्यू झाला तरी कसा? काय सांगतो पोस्टमॉर्टम रिपोर्ट?
काय राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस?
19 जुलै 2021 ला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकला होता. त्यानंतर त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं. त्याच्यावर आरोप होता की, तो अडल्ट कंटेट बनवतो आणि तो हॉयशॉटच्या नावाखाली अॅपच्या माध्यामातून शेअर करतो. त्यामुळे त्याला तब्बल 63 दिवस जेलमध्ये रहावं लागलं होत.
त्यानंतर कित्येक दिवस ते सोशल मीडियापासून दूर होते. तसेच माध्यामं आणि पापाराझींपासून देखील स्वतःचा बचाव करत होते.बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांनी 2009 मध्ये विवाह केला होता. त्यांना दोन मुल आहेत. विआन आणि समिषा अशी त्यांची नाव आहेत. समिषा ही मुलगी त्यांना सरोगसीद्वारे झाली आहे.