Alia Ranbir Kissing: …अन् सर्वांसमोर आलियाने रणबीरला केलं Kiss; दोघांची जवळीक पाहून नेटकरी म्हणाले…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T125218.206

Alia Ranbir Kissing : अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांच्या एका पोस्टची गेल्या काही दिवसांत चर्चा होती. या पोस्टद्वारे त्यांनी रणबीरची (Ranbir Kapoor) एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफला (Katrina Kaif) टोमणा मारल्याचं सांगितले जात आहे. या चर्चांच्या दरम्यान नुकताच आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीरचा किस करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


या दोघांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. हे दोघं मुंबईमधील त्यांच्या नवीन घराचे बांधकाम बघायला गेले होते. त्यावेळी आलिया आणि रणबीरचा व्हिडीओ शूट करण्यात आला. या व्हिडीओमुळे हे दोघे सध्या सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया त्यांच्या गाडीमध्ये बसले असल्याचे दिसत आहेत. त्यांच्या गाडीत बसूनच रणबीर चाहत्यांना बोल्ट आहे.

यावेळी त्याच्या बाजूला बसलेली आलिया रणबीरच्या गालावर किस करते आणि त्याला मिठी मारत आहे. एकीकडे चाहते या दोघांची केमिस्ट्री बघून खुश झाले आहेत. तर दुसरीकडे काही चाहत्यांनी आलियाला ‘फेक’ (खोटी) असं म्हटले आहे. रणबीर आता तुझाच आहे, दीपिका किंवा कतरिनाचा नाही. तू का ओव्हरॲक्टिंग करत आहे’, असे एका चाहत्याने तिला कॉमेंट्स केले आहे तर ‘आम्ही दोघं एकमेकांच्या खूप प्रेमात आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न आलिया करत आहे, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे’, असं दुसऱ्या युजरने तिला कॉमेंट्स केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)


नीतू कपूर यांची पोस्ट नुकतीच चर्चेत आली होती. ‘त्यांनी तुम्हाला ७ वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करणार. माझे काका ६ वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या एका पोस्टमध्ये लिहिले होतते. नीतू कपूर यांची ही स्टोरी पाहिल्यावर चाहत्यांनी त्याचा संबंध रणबीर कपूरच्या भूतकाळात असलेल्या रिलेशनशिप्सशी लावला. यावरून काहींनी नीतू यांच्यावर देखील जोरदार टीका केल्या होत्या.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

खरे तर अजब प्रेम की गजब कहाणी या सिनेमामुळे दोघे जवळ आले असल्याचे सांगितले जात आहे. रणबीर आणि कतरिनाचे रिलेशनशिप इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होते. जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीला देखील कतरिनाने हजेरी लावली होती. मात्र ज्यावेळी या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली, तेव्हाच त्यांचे मार्ग वेगळे झाले. रणबीरने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आलिया भट्टशी लग्न केले आहे. या दोघांना राहा ही मुलगी देखील झाली आहे. तर कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube