दीपक तिजोरीचं मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन; ‘टिप्प्सी’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

दीपक तिजोरीचं मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन; ‘टिप्प्सी’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Tipppsy Trailer Out: 90 च्या दशकातील प्रसिद्ध हिरो दीपक तिजोरी (Deepak Tijori ) सध्या त्याच्या ‘टिप्सी’ चित्रपटामुळे (Tipppsy Film) जोरदार चर्चेत आहे. दीपक तिजोरीच्या ‘टिप्सी’चा ट्रेलर (Tipppsy Trailer ) गुरुवारी रिलीज झाला. हा चित्रपट अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. (Social media) गुरुवारी मुंबईत झालेल्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाच्या दरम्यान दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि पूजा भट्ट देखील हजेरी लावली होती.

‘टिप्सी’चा ट्रेलर

2 मिनिट 32 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरुवात गोव्यासारख्या सुंदर शहरापासून होते. 5 मुलींचा ग्रुप सहलीला जातो, पण गोव्याची ही सहल या मुलींसाठी आपत्ती ठरणार आहे. याबद्दल त्या मुलींना माहिती नसते. मुलींचा हा प्रवास त्यांना तुरुंगात जाण्यास भाग पाडतो. दीपक तिजोरीची दमदार एन्ट्रीही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. जो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. दीपक व्यतिरिक्त अलंकृता सहाय, नताशा सुरी, कैनात अरोरा, नाझिया हुसैन, सोनिया बिर्जे, हरजिंदर सिंग, मनदीप कौर संधू आणि दानिश भट्ट दिसत आहेत.

पूजा भट्ट आणि दीपक

दीपक तिजोरी आणि त्यांचे मित्र पूजा आणि महेश भट्ट यांनी या शैलीत मीडिया कॅमेऱ्यांना पोज दिली. यावेळी अभिनेता पिवळ्या टी-शर्ट आणि काळ्या जीन्समध्ये दिसला. तर महेश काळ्या टी-शर्टसह जीन्स आणि चप्पल घातलेला दिसत होता. अभिनेत्री पूजाबद्दल बोलायचे झाले तर ती यावेळी ब्लॅक लूकमध्ये दिसली.

सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश आणि… ; मुंबई पोलिसांची धक्कादायक माहिती

या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार

‘टिप्सी’चे दिग्दर्शन दीपक तिजोरी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती राजू चड्ढा आणि दीपक तिजोरी यांनी केली आहे. सना खान आणि अनिता शर्मा या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. पॅनोरमा स्टुडिओ हा चित्रपट देशभर प्रदर्शित करणार आहे. जो 10 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube