Priyanka Chopra: स्वतः च्या एक्स नात्यांबद्दल देसी गर्लचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली, ‘कलाकारासोबत मी…’
Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणजेच देसी गर्ल (Desi Girl) ही काही ना काही कारणाने सतत जोरदार चर्चेत असते. सध्या प्रियांका तिचा पती निक जोनास (Nick Jonas) आणि बेबी मालतीसोबत अमेरिकेत (America) आहे. मात्र लग्नाच्या अगोदर देसी गर्ल बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांबरोबर नाव जोडले गेले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये देसी गर्लने आपल्या बॉलीवूडमधील (Bollywood) एक्स नात्याबद्दल मनमोकळेपणे सांगितले आहे.
View this post on Instagram
‘कॉल हर डॅडी’ पॉडकास्टच्या (Call Her Daddy Podcast) नवीन एपिसोडमध्ये देसी गर्लने तिच्या बॉलीवूडमधील प्रेमप्रकरणावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. तिने एका मुलाखतीमध्ये देसी गर्लला विचारण्यात आले होते की, ती तिचा रोमँटिक जोडीदार निवडत असताना काही विशिष्ट पॅटर्न फॉलो करत होती का? याला उत्तर देत असताना देसी गर्लने सांगितले आहे की, असा कोणताही पॅटर्न नाही. स्वतःला एक ‘मोनोगॅमिस्ट’ म्हणत देसी गर्लने सांगितले आहे की, ‘मी एकामागून एक नात्यात जात राहिले. मी स्वतःला वेळ देणे बंद केले होते.
मी ज्या कलाकारांबरोबर काम केले किंवा सेटवर असायचे, त्यांना डेट केले. नाते कसे असावे हे मला माहीत होते आणि या प्रयत्नामधून माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला मी त्या साच्यात बसवत असायचे. तसेच देसी गर्ल पुढे म्हणाली की, प्रत्येक वेळी रिलेशनशिपमध्ये ती एकच चूक करत होते की, ती स्वत:ला केअर टेकरप्रमाणे वागवत होती. मी माझी नोकरी, माझी आवड आणि स्वतःला कधीच महत्त्व दिलेले नव्हते.
View this post on Instagram
मला खरंच वाटू लागले आहे की, मी एक पायपुसणे झाले होते. कारण मी ज्या पार्श्वभूमीमधून आले आहे, तिथे स्त्रियांना हेच शिकवले जात असायचे. कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी, पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी, कामावरून घरी आल्यावर त्याला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला हे सर्व करावे लागत असायचे. देसी गर्लने पुढे सांगितले आहे की, निक तिच्या आयुष्यामध्ये येण्याअगोदर ती ज्या रिलेशनशिपमध्ये होती, त्यामध्ये तिला हरवल्यासारखे वाटले होते.
राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी
निक जोनासबरोबर लग्न करण्याअगोदर देसी गर्लने दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता आणि आपण प्रत्येक वेळी रिलेशनशिपमध्ये कोणती चूक केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असलयाचे तिने यावेळी सांगितले आहे. तसेच जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही समजून घेणार नाही, असे देखील देसी गर्ल म्हणाली आहे. देसी गर्ल म्हणाली की, मी ज्या लोकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते ते सगळे खूप चांगले लोक होते. देसी गर्लचे नाव बॉलीवूडमधील अक्षय कुमार, शाहरुख खान, हरमन बावेजा आणि शाहिद कपूरबरोबर जोडले गेले असल्याची चर्चा होती.