Monkey Man Trailer: देव पटेलच्या ‘या’ हॉलिवूड चित्रपटातून शोभिताची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री

Monkey Man Trailer: देव पटेलच्या ‘या’ हॉलिवूड चित्रपटातून शोभिताची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री

Monkey Man Trailer: ऑस्कर नामांकित अभिनेता देव पटेल (Dev Patel) त्याच्या आगामी ‘मंकी मॅन’ (Monkey Man Movie) या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. आता त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, (Monkey Man Trailer) जो ॲक्शनने भरलेला आहे. या चित्रपटातून देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शोभिताने हॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली: देव पटेलच्या या चित्रपटातून अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) हॉलिवूडमध्ये (Hollywood) पदार्पण करणार आहे. बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये धमाल केल्यानंतर शोभिता आता हॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याची एक छोटीशी झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

चित्रपटाची कथा एका भूमिगत फाईट क्लबमध्ये आयुष्य जगणाऱ्या मुलाभोवती फिरते. देव पटेल हे शक्तिशाली पात्र साकारत आहे, जो गोरिल्ला मास्कच्या मागे लपून लढतो. चित्रपटाची कथा भगवान हनुमानापासून प्रेरित आहे. देव पटेल यांचा हा चित्रपट 5 एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट जॉर्डन पीलच्या स्वतःच्या मंकीपॉ प्रोडक्शन अंतर्गत तयार करण्यात आला आहे, तर हा चित्रपट युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारे प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला: या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून चाहते या चित्रपटाबाबत कमालीचे उत्सुक असल्याचे दिसत आहे. देव पटेलचे पात्र प्रेक्षकांना खूपच प्रभावी वाटले. ट्रेलरमधील त्याचे पात्र पाहून अनेकांच्या मनात जॉन विकच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचं व्यसनाबद्दलचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला…

शोभिता धुलीपाला वर्कफ्रंट: शोभिता धुलिपालाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मंकी मॅन व्यतिरिक्त शोभिता लवकरच आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘जिगरा’ चित्रपटात दिसणार आहे. वासन बाला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शबिताची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. शोभिता नुकतीच झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या ‘मेड इन हेवन 2’ या वेबसिरीजमध्येही दिसली आहे. याशिवाय अभिनेत्री ‘कालाकांडी’ आणि ‘द नाईट मॅनेजर’ सारख्या मालिकांमध्येही दिसली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube