Devendra Fadanvis यांचा ‘तो’ व्हिडीओ अन् तेजस्विनी म्हणाली, ‘ह्यांना कळतंय ना…’

Devendra Fadanvis यांचा ‘तो’ व्हिडीओ अन् तेजस्विनी म्हणाली, ‘ह्यांना कळतंय ना…’

Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राज्यातील टोल संदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राज्यातील राजकारण आणि सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने देखील फडणवीसांच्या या वक्तव्यावर एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत टीका केली आहे. त्यावेळी तिने त्यांचा त्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

World Cup 2023: न्यूझीलंडसमोर नवख्या नेदरलँड्सचे आव्हान, पाहा प्लेइंग-11

काय म्हणाली तेजस्विनी पंडीत?

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने देखील फडणवीसांच्या या वक्तव्यावर एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister” Unbelievable!!SHARE IF YOU FEEL CHEATED TOO !!!’ असं म्हणत तेजस्विनीने #सगळेहुकलेत #अवघडआहेबुवा #महाराष्ट्रजागाहो. असे हॅशटॅग देखील दिले आहेत.

काय म्हणाले होते फडणवीस?

प्रवाशांच्या खासगी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल घेतला जात आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशाराही देऊन टाकला. राज ठाकरे यांनी आज आपल्या घरी पत्रकार परिषद घेत टोलसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. टोलवसुली हा राज्यातील मोठा घोटाळा आहे, असा दावाच त्यांनी केला.

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची शक्यता संपुष्टात; पुणे-चंद्रपूरचे बिगुल नव्या लोकसभेसोबतच वाजणार

दरम्यान या वक्तव्यावर आणि ठाकरेंच्या आरोपावर फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 12 टोलनाक्यांवर वसुली बंद असल्याचे तसेच, MSRDC च्या 53 नाक्यांवर कार, जीप आणि एसटीला सूट देण्यात आल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याचा जीआर 31 ऑगस्ट 2017 लाच जारी करण्यात आल्याचेही फडणवीस यांच्या कार्यलयाने सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube