Rockstar DSP : संगीतकार रॉकस्टार डीएसपी प्रत्येक दिग्दर्शकाचा आवडता? जाणून घ्या कारण…
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपी ( Rockstar DSP) म्हणून ओळखले जाणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

Dhinka Chika to Pushpa Pushpa: रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद (Devi Sri Prasad) यांनी सातत्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील काही अविस्मरणीय ट्यून दिले आहेत. ‘वर्षम’ च्या सदाबहार गाण्यांपासून ते ‘पुष्पा 2: द रुल’च्या (Pushpa 2) बहुप्रतीक्षित गाण्यांपर्यंत, डीएसपीच्या गाण्याची चर्चा जगभरात आहे. केवळ गाण्यांनी नाही तर त्याच्या प्रतिभेने त्याला मोठा चाहता वर्ग आणि असंख्य प्रशंसा मिळवून दिली आहे, ज्यामुळे तो देशभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वोच्च निवड बनला आहे.
View this post on Instagram
2024 हे वर्ष डीएसपीच्या संगीतासाठी खास ठरतं ‘पुष्पा 2: द रुल’ असो, सुरियाचा ‘कंगुवा’ असो किंवा पवन कल्याणचा ‘उस्ताद भगतसिंग’ असो, DSP चा 2024 लाइनअप हे त्याच्या विलक्षण अष्टपैलुत्वाचे खरे प्रदर्शन आहे आणि तो इंडस्ट्रीमध्ये कसा सगळ्यांचा आवडता आहे हे दाखवून देतो. याशिवाय, डीएसपी अजितच्या ‘गुड बॅड अग्ली’, नागा चैतन्यच्या ‘थंडेल’, धनुषच्या ‘कुबेरा’ आणि राम चरणच्या अद्याप शीर्षक नसलेल्या प्रकल्पासाठी त्याचे संगीत देणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=wxSI5D9EsM8
डीएसपीने संगीताच्या सीमांना पुढे ढकलणे आणि प्रत्येक प्रकल्पात नावीन्य आणणे सुरू ठेवल्याने हे स्पष्ट आहे की त्याच्या पिढीतील अग्रगण्य संगीतकारांपैकी एक म्हणून त्याचा वारसा दृढपणे चालवत आहे. त्याच्या संगीताचे साक्षीदार होण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, संगीतकार भारतीय संगीत उद्योगात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी आणि आपल्या उल्लेखनीय रचनांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहण्यासाठी सज्ज झाला आहे.
Rockstar DSP ने करावा भारत दौरा; चाहत्यांनी व्यक्त केली इच्छा!
रॉकस्टार डीएसपी म्हणून ओळखले जाणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, ज्यांना पुष्पा: द रायझिंग या तेलगू सिनेमातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.