“चित्रपटाचे भवितव्य पहिल्या आठवड्याच्या कमाईवर ठरत नाही”; शेखर कपूरची इम्तियाज अलीच्या ‘मैं वापस आऊंगा’ला दाद
Main Vapas Aunga निर्माते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपटाचे आणि इम्तियाज अली यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.
films future doesn’t on first week earnings Shekhar Kapoor praises Imtiaz Ali’s ‘Main Vapas Aunga : प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, भावनिक प्रतिक्रिया आणि चित्रपटगृहांमध्ये वाढती मागणी यामुळे दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घोडदौड करत आहे. वाढत्या प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाचे अतिरिक्त शो सुरू केले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात मोठी वाढ! राज्य सरकारकडून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय
चित्रपटाला मिळालेल्या या प्रतिसादाने प्रेक्षकांसोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकही प्रभावित झाले आहेत. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाचे आणि इम्तियाज अली यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.
लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या; होणाऱ्या पत्नीसह 8 जणांवर गुन्हा दाखल
शेखर कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मैं वापस आऊंगा’ने चित्रपटसृष्टीतील एक जुना समज खोटा ठरवला आहे. पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस कमाईच एखाद्या चित्रपटाचे भवितव्य ठरवते, हा समज या चित्रपटाने मोडून काढला आहे. उत्कृष्ट कथा, प्रभावी सादरीकरण आणि प्रेक्षकांबद्दलचा आदर यामुळे चित्रपट यशस्वी होऊ शकतो, हे इम्तियाज अली यांनी दाखवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
मानसिक संतुलन बिघडलं, काय पोराटोरांचे ऐकता? उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
या चित्रपटात दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, शरवरी आणि वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बिरला स्टुडिओज, अप्लॉज एंटरटेनमेंट आणि विंडो सीट फिल्म्स यांच्या सहनिर्मितीत तयार झालेला हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
पोलिसांनी मुख्य सुत्रधाराचं नाव टाळलं; बीडच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक
हा कालखंडावर आधारित चित्रपट 95 वर्षीय ईश्वर सिंह ग्रेवाल यांच्या आयुष्याभोवती फिरतो. पाकिस्तानमधील सरगोधा येथे जाण्याच्या प्रयत्नात त्यांना स्ट्रोक येतो आणि त्यानंतर फाळणीपूर्व काळातील आठवणी जाग्या होतात. त्याचवेळी त्यांचा नातू निर्वैर इंग्लंडहून परत येऊन कुटुंबातील अनेक वर्षे दडवून ठेवलेली रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करतो. ईश्वर यांच्या भावनिक प्रवासाभोवती गुंफलेले हे रहस्यच चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.