Gadar 2 song out : सनी देओल पुन्हा निघाला ‘गडी लेके’; गदरचं एव्हरग्रीन गाणं गदर 2 च्या प्रेक्षकांच्या भेटीला…

Gadar 2 song out : सनी देओल पुन्हा निघाला ‘गडी लेके’; गदरचं एव्हरग्रीन गाणं गदर 2 च्या प्रेक्षकांच्या भेटीला…

Gadar 2 song out : सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चा ट्रेलर मोठ्या धडाक्यात रिलीज झाला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. त्यात आता या चित्रपटातील एव्हरग्रीन असं गदरचं गाणं गदर 2 च्या प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Gadar 2 song out which was already in Gadar part one mai nikala gaddi leke… )

गदर चित्रपट 2001 ला आला होता तेव्हा या गाण्याने आक्षरशः धुमाकूळ घआतला होता. मैं निकला ओ गड्डी लेके… असे या गाण्याचे बोल होते. आजही हे गाणं तितक्याचं उत्साहाने ऐकलं, वाजवलं आणि त्यावर डान्स केला जातो. त्यामुळे गदर 2 सोबतही, निर्माते चित्रपटाच्या संगीताच्या बाबतीत कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यांच्या चाहत्यांना एक खास ट्रीट देत निर्मात्यांनी ‘मैं निकला गड्डी लेके’ हे आयकॉनिक गाणं पुन्हा लाँच केला आहे.

भारताच्या गोलंदाजांचं जोरदार कमबॅक; वेस्ट इंडिजकडून 150 धावांचं लक्ष्य

दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट आहेत.

Pune News : सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला हिंदू देवतांवर बोलणं भोवलं! डेक्कन पोलिसांनी केलं अटक…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube