‘गौरीशंकर’मधून उलगडणार प्रतिशोधाची अनोखी कथा, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘गौरीशंकर’मधून उलगडणार प्रतिशोधाची अनोखी कथा, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Gaurishankar Movie Teaser Released On Social Media : आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता ‘गौरीशंकर’ या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार (Entertainment News)आहेत. नव्या दमाचे कलाकार असलेला ‘गौरीशंकर’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात (Marathi Movie) आले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन; ८७ वर्षी मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

मुव्ही रूट प्रस्तुत आणि ऑरेंज प्रोडक्शन निर्मिति संस्थेअंतर्गत ‘गौरीशंकर’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विशाल प्रदीप संपत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हरेकृष्ण गौडा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायाचित्रण केले आहे. संकेत कोळंबेकर यांनी लिहिलेल्या गीतांना अमित जवळकर यांनी संकलन, प्रशांत निशांत यांचे सुमधुर संगीत लाभले (Gaurishankar Movie)  आहे. या चित्रपटात हरेकृष्ण गौडा, दक्षिणा राठोड, काव्या (कविता) सूर्यवंशी वसानी, राहुल जगताप या नवोदित कलाकारांच्या दमदार भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.

अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, पालकमंत्री पदाचा तिढा जवळ-जवळ सुटल्यात…

‘गौरीशंकर’ या चित्रपटातली कथा आहे गौरी आणि शंकर यांच्या प्रेमाची. दुर्दैवानं त्यांच्या प्रेमात एक संकट निर्माण होते. त्याच्यावर आलेल्या संकटाचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न या आशयसूत्रावर ‘गौरीशंकर’ हा चित्रपट बेतला आहे. नव्या दमाचे कलाकार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एक थरारक, रोमांचक मनोरंजक कथानक मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ‘गौरीशंकर’ प्रदर्शित होण्याची रसिकप्रेक्षकांना अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे.

‘गौरीशंकर’मधून उलगडणार प्रतिशोधाची अनोखी कथा उलगडणार असल्याचं दिसतंय. टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टीजरचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौरीशंकर चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube