Happy Birthday Kajol : दिलखुलास हसण्याने काजोलला बसला होता बिग बींचा ओरडा

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 08 05T113118.685

Happy Birthday Kajol : स्माईल क्वीन आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या ह्रदयावर अभिराज्या गाजवणाऱ्या काजोलचा आज (दि. 5) वाढदिवस आहे. काजोल आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांसह ओटीटी प्रोजेक्टवर काम केले आहे. एकीकडे काजोलच्या मोकळ्या हास्याने अनेकजण आकर्षित होतात. मात्र, याच हास्यामुळे काजोलला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.  याच मनमोकळ्या हास्यमुळे काजोलला अमिताभ बच्चन यांनी काजोलला फटकारले होते, तर किंग खान शाहरूखने शटआप असे म्हटले होते. नेमका हा किस्सा काय आपण जाणून घेऊया.

‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला

बिग बींनी फटकारले होते

‘कौन बनेगा करोडपती’च्या 14व्या सीझनमध्ये काजोल तिच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. हा कार्यक्रमाचा शेवटचा भाग होता. या क्विझ शो दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या विनोदाने बिग बींना खूप प्रभावित केले होते. यावेळी अमिताभ यांनी करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील एक किस्सा शेअर केला.

Guns and Gulaabs Trailer : राजकुमार रावच्या ‘गन्स एंड गुलाब्स’ मध्ये दिसणार दिवंगत अभिनेते सतिश कौशिक, ट्रेलर रिलीज…

या शो दरम्यान उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने काजोलला प्रश्न विचारला होता. ज्यात त्याने कभी खुशी कभी गममध्ये तुम्ही खूप घाबरलेल्या दिसत होत्या. त्यावर काजोलने आपल्याला अभिताब बच्चन यांची खूप भीती वाटत असल्याचे उत्तर दिले होते. परंतु, यावर बच्चन यांनी काजोलचे उत्तर खोडून काढत चित्रपटाच्या एका सीनदरम्यान सर्वांच्या डोळ्यात आश्रू होते. त्यात काजोलला कोणताही डायलॉग नव्हता. पण हा सीन सुरू असताना दुसरीकडे काजोल जोरजोरात हसत होती. त्यावेळी असे वागणे एखाद्या कलाकारासाठी हे किती निराशाजनक आहे याची कल्पना आहे का? असे म्हणत फटकारल्याचा किस्सा बच्चन यांनी यावेळी सांगितला होता.

विरोधी पक्ष नेत्याचा कोट अन् राज्याचा अर्थसंकल्प… : जयंत पाटलांनी सांगितला राणेंच्या दिलदारपणाचा किस्सा

काम कर आणि जा

बच्चन यांच्यासह शाहरूख खानलादेखील काजोलच्या हसण्याने एकेकाळी नाराज झाला होता. स्वतः काजोलने एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला होता. हा किस्सा ‘करण अर्जुन’ चित्रपटातील ‘जती हूँ मैं’ गाण्यादरम्यानचा होता. या शूटिंगदरम्यान काजोलला हसू आवरणे कठीण होत होते, तर तिच्या सततच्या हसण्याने शाहरूख खानला काम करणे अवघड होत होते. त्यावेळी शाहरूखने आपल्याला गप्प राहण्यास आणि काम संपवून घरी जाण्याचा सल्ला दिला होता.

Tags

follow us