खतरनाक जासूसचा नवा बेंगर ‘बंदा तेरे लिए’ रिलीज; रोमँटिक डान्स नंबरमध्ये दिसला नवा ट्विस्ट
Happy Patel : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म हॅपी पटेल: खतरनाक जासूस रिलीजसाठी पूर्णपणे सज्ज आहे. या चित्रपटात वीर दास मुख्य भूमिकेत
Happy Patel : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म हॅपी पटेल: खतरनाक जासूस रिलीजसाठी पूर्णपणे सज्ज आहे. या चित्रपटात वीर दास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि मेकर्सनी आता यातील नवं धमाकेदार गाणं ‘बंदा तेरे लिए’ रिलीज केलं आहे. हे गाणं बॉलिवूड रोमॅन्सला एक ताज्या आणि मजेशीर अंदाजात सादर करतं, ज्यामध्ये डान्स नंबरला प्लेफुल आणि मॉडर्न ट्विस्ट देण्यात आला आहे.
दिल्ली बेली (Aamir Khan Productions) मधील सुपरहिट आणि हटके गाणं ‘भाग डीके बोस’ नंतर, ‘बंदा तेरे लिए’ देखील लवकरच चार्टबस्टर यादीत सामील होईल, असं चित्र दिसत आहे. हिंदी सिनेमात सहसा महिला कलाकारच नायकाला रिझवताना गाणं आणि नृत्य करताना दाखवल्या जातात. मात्र ‘बंदा तेरे लिए’ हा ट्रेंड बदलतो. मेनस्ट्रीम बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पूर्ण फोकस मेल लीडवर आहे.
गाण्यात वीर दास (Vir Das) संपूर्ण मनापासून आपल्या लेडी लव्हला रिझवताना आणि परफॉर्म करताना दिसतात, तर महिला पात्र बसून त्यांचा परफॉर्मन्स एन्जॉय करताना दाखवली आहे. या गाण्यात वीर दाससोबत मिथिला पालकरही झळकते. दोघेही आपापल्या सिग्नेचर चार्म आणि सहज ग्रेससह या रोमँटिक वातावरणाला खास बनवतात. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री गाण्याला हलकं-फुलकं आणि अत्यंत एंटरटेनिंग बनवते, ज्यामुळे ते पाहणं सहज आणि मजेशीर ठरतं.
‘बंदा तेरे लिए’ हा एक आऊट-अँड-आऊट बेंगर आहे. हे गाणं ऐश किंग आणि अजय जयंती यांनी गायले आहे आणि गाण्याची एनर्जी त्याच्या प्लेफुल फीलला पूर्णपणे सपोर्ट करते. म्युझिक अजय जयंती आणि पार्थ पारेख यांनी कंपोज केलं आहे, ज्यामध्ये मॉडर्न बीट्स आणि देसी फ्लेवरचा उत्तम संगम पाहायला मिळतो. त्यामुळे हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.
आमिर खान प्रोडक्शन्सने नेहमीच वेगळ्या आणि हटके कथा प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. लगान, तारे ज़मीन पर, दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार सारख्या संस्मरणीय चित्रपटांनंतर ही आणखी एक युनिक सिनेमा सादर करण्याची प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन वीर दाससोबत सहकार्य करण्यात आलं आहे.
16 Years of 3 Idiots : 5 कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा ‘हा’ चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो
वीर दास यांनी जगभरातील आपल्या कॉमेडी स्पेशल्समधून ओळख निर्माण केली असून गो गोवा गॉन, बदमाश कंपनी आणि दिल्ली बेली सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दिल्ली बेली नंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबत वीर दास यांचा हा दुसरा कोलॅबोरेशन आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या हॅपी पटेल: खतरनाक जासूसचं दिग्दर्शन स्वतः वीर दास यांनी केलं आहे. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
