प्रेरणा अरोराच्या Hero Heroin च्या शूटिंग ला सुरुवात; सोनी राजदानही साकारणार भूमिका

प्रेरणा अरोराच्या Hero Heroin च्या शूटिंग ला सुरुवात; सोनी राजदानही साकारणार भूमिका

Hero Heroin films shooting start : सिनेमाच्या जगात जिथे अनेक नाविन्य पूर्ण गोष्टी कायम घडत असतात अश्याच गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ ( Hero Heroine ) सज्ज होत आहे. “हिरो हिरोईन,” हा नव्या चित्रपटाची निर्मिती दूरदर्शी निर्माती प्रेरणा अरोरा ( Prerana Arora ) करत असून दिग्दर्शक सुरेश क्रिस्ना हे याच दिग्दर्शन करणार आहेत.

ओमराजेंच्या आरोपानंतर तेरणा रुग्णालयातील उपचार घेतलेले लोकं अर्चना पाटलांच्या गोटात

“टॉयलेट: एक प्रेम कथा” आणि “पॅडमॅन” यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी ओळखली जाणारी, निर्माती प्रेरणा अरोरा पारंपारिक सिनेमाच्या सीमांना पुढे नेऊन कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट करते. हीरो हिरोईन चित्रपट उद्योगाच्या पार्श्वभूमीवर रील आणि वास्तविक यांच्यातील गुंतागुंतीची गोष्ट सांगणार आहे.

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मी ब्राह्मण, तो कासार..’

या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भटची आई सोनी राजदान आणि दिव्या खोसला दिसणार आहेत. 10 जूनपासून प्रेरणा अरोरा हिरो हिरोईनच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हैदराबाद येथे चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुवात होणार आहे.आशियामधला सगळ्यात मोठ्या स्टुडिओ मध्ये म्हणजे रामोजी फिल्म सिटी इथे चित्रपटाच शूट होणार आहे. चित्रपटात आउटडोअर आणि इनडोअर अशा एकूण 35 लोकेशन्स असून स्बिहारची पार्श्वभूमी दर्शविणारा सेट बनवला जात आहे असं देखील कळतंय. हैदराबादमध्ये हे खास शूट होणार असल्याने कलाकार आणि निर्माती देखील या साठी उत्सुक आहे.

सुरुवात उदयनराजेंपासून… पवारांनी पाच वर्षात मान्य केल्या ‘पाच चुका’

मंत्रमुग्ध करणारी दिव्या खोसला ही यातून दिसणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पोस्टर्सच्या लाँच ने प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रेरणा अरोरा या बद्दल म्हणते ” नावीन्यपूर्ण गोष्टीवर काम करण्याची इच्छा असताना या सारखा प्रोजेक्ट मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. याची आम्हाला खात्री आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube