‘हिरो की हैवान?’ प्रश्न पडणार; अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या ‘हैवान’चा थरारक टीझर रिलीज
Haivan च्या पहिल्या लूक पोस्टर्सच्या प्रतिसादानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ आणि धोकादायक विश्वात घेऊन जाण्यास सज्ज झाला आहे
‘Hero or Villain’ question arises thrilling teaser of Akshay Kumar and Saif Ali Khan’s ‘Haivan’ has been released : ‘हैवान’ च्या पहिल्या लूक पोस्टर्सला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ आणि धोकादायक विश्वात घेऊन जाण्यास सज्ज झाला आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या या थरारपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातून चित्रपटाच्या रहस्यमय कथानकाची पहिली झलक पाहायला मिळत आहे.
अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हैवान’बाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. आता टीझरमुळे या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे. गूढता, धोका आणि माणसाच्या ‘हैवानी’ वृत्तीभोवती फिरणाऱ्या या कथेत नेमकं काय दडलं आहे, याचा अंदाज टीझरमधूनही पूर्णपणे लागत नाही.
Chakan Issue : उद्योगांचे स्थलांतर नव्हे, पुण्याच्या प्रगतीला सुरुंग; ‘चाकण’चा पट्टा महत्त्वाचा का?
टीझरमध्ये अंधाराने व्यापलेले वातावरण, रहस्यमय सावल्या आणि काही क्षणांच्या दृश्यांची गुंफण पाहायला मिळते. मात्र, निर्मात्यांनी कथानकातील महत्त्वाचे खुलासे जाणीवपूर्वक लपवून ठेवले आहेत. टीझरमधील प्रत्येक दृश्य एखाद्या मोठ्या रहस्याचा छोटासा भाग असल्यासारखे वाटते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो—‘हिरो की हैवान?’
राजकीय चर्चांना उधाण; राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड बैठक
अक्षय कुमार आणि सैफ अली खान कोणाच्या बाजूने आहेत आणि पडद्यावर नेमकं कोण नायक तर कोण खलनायक, याचा उलगडा सध्या करण्यात आलेला नाही. दोन्ही कलाकार एका अनपेक्षित आणि धोकादायक जगात आमनेसामने येताना दिसणार असल्याने त्यांच्या संघर्षाची उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या जोडीसोबत चित्रपटात बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
Video : चर्चा तर करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन; वेळ सांगत शाहांचं विरोधकांना खुलं आव्हान
टीझरनंतर आता प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागले आहे. ट्रेलरमध्ये या गूढ जगाचा आणि ‘हैवानी’ वृत्तीचा आणखी मोठा पट उलगडण्याची शक्यता आहे. ‘हैवान’ची निर्मिती KVN Productions आणि Thespian Films यांच्या बॅनरखाली वेंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन यांनी केली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ 11 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.