धक्कादायक! वडियांच्या मृत्यूच्या धक्क्याने अभिनेत्याने वयाच्या 25 व्या वर्षी सोडले प्राण

धक्कादायक! वडियांच्या मृत्यूच्या धक्क्याने अभिनेत्याने वयाच्या 25 व्या वर्षी सोडले प्राण

Angus Cloud Passed Away : अभिनय क्षेत्रामध्ये नहमीच अनेकांच्या मृत्यूच्या धक्कादायक बातम्या येतात. त्यामध्ये अनेकदा आत्महत्या, विविध आजार अपघात यांचं प्रमाण जास्त असत. त्यात आता हॉलिवूडमधून एका तरूण अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी आली आहे. 25 वर्षीय हॉलिवूड अभिनेता ‘यूफोरिया’ फेम एंगस क्लाऊडचं निधन झालं आहे. (Hollywood Actor Angus Cloud Passed Away due to fathers death )

संभाजी भिडेच्या तोंडाला काळं फासा अन् 1 लाख जिंका, काँग्रेसची घोषणा

त्याच्या मृत्यूच्या कारणाने अनेकांना धक्का बसला आहे. कारण त्याचा मृत्यू हा वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफ़ॉर्निया या शहरात तो राहत होता. त्याच्या ‘यूफोरिया’ या सीरिजने प्रेक्षकांना जिंकल होतं. त्याच्या या आकस्मिक मृत्यूने त्याच्या कुटुंबियांसह चाहते आणि हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

बिहारमध्ये पुन्हा जातनिहाय जनगणना होणार, पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाचा बिहार सरकारला दिलासा

याबद्दल त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, तो त्याच्या वडिलांवर अत्यंत प्रेम करत होता. वडिलांच्या जाण्याने त्याला मोठा मानसिक धक्का बसला. आम्ही त्याच्या सोबत होतो पण त्याने स्वतःला सावरले नाही. त्याचं निधन झालं आहे.

एंगस क्लाउड हा त्याच्या मित्रांसोबत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरत असताना त्याला ‘यूफोरिया’ च्या कास्टींग दिग्दर्शकाने पाहिलं होतं. तेथेच त्याला ‘यूफोरिया’ मध्ये भूमिका मिळणार हे नक्की झालं होतं. त्याला दिग्दर्शकाने विचारलं की, तो वेबसीरीजमध्ये काम करणार का? त्यानंतर त्याची ही पहुलीच सीरीज चाहत्यांनी डोक्यावर घेतली. तो लोकप्रिय झाला. पण ही सीरीज वादातही सापडली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube