Adipurush विरोधात कालिचरण महाराज मैदानात; चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं केलं आवाहन

Adipurush विरोधात कालिचरण महाराज मैदानात; चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं केलं आवाहन

Kalicharan Maharaj On Adipurush : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा देशभरात जोरदार चर्चेत आला आहे. कुठे या सिनेमावर टीका, विरोध होत आहे. तर कुठे तोडफोड देखील करण्यात येत आहे. देशभरातून ‘आदिपुरुष’ सिनेमाला विरोध होत आहे. आता महाराष्ट्रातील हिंदू संघटना देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच तो चर्चेत आला आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड सोडली जात आहे. आता कालिचरण महाराजांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं हिंदू समाजाला केलं आहे. ( Kalicharan Maharaj Appeal for boycott Adipurush )

काय म्हणाले कालिचरण महाराज ?
‘आदिपुरुष’चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या घटना हिंदू विरोधी आहेत. तसेच देवाच्या चरित्राचा अपमान करणारे शब्द या चित्रपटात वापरण्याक आले आहेत. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे. हिंदूंच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घालावा. अशी मागणी कालिचरण महाराज यांनी केली आहे. तसेच ते असं देखील म्हणाले की, मी आदिपुरूष चित्रपट पाहिला नाही पण जे लोक या चित्रपटाला पठिंबा देत आहेत. ते धर्मविरोधी आहेत. तर ज्यांना या चित्रपटामुळे वाईट वाटत आहे. ते धर्मप्रेमी असल्यांच या महाराजांनी म्हटलं आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

आदिपुरुष या सिनेमातल्या दाखवण्यात आलेल्या घटना हिंदू विरोधी आहेत. तसंच देवाच्या चरित्राचा अपमान करणारे शब्द या सिनेमात वापरण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे. हिंदूंच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदूंनी या सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे अशी मागणी कालीचरण महाराजांनी केली आहे. आदिपुरुष हा सिनेमा मी पाहिलेला नाही. जे लोक या सिनेमाला पाठिंबा देत आहेत ते धर्मविरोधी आहेत. ज्यांना वाईट वाटतं आहे ते धर्मप्रेमी आहेत. जे धर्मप्रेमी आहेत त्यांनी या सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे.

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण: पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा; CCTV मध्ये एकटाच दिसला मित्र

दरम्यान वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र यशस्वी ठरला आहे. आता या सिनेमावर होत असलेला विरोध लक्षात घेत आणि चाहत्यांच्या भावनांचा आदर करत निर्मात्यांनी या सिनेमामधील वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार असल्याचे जाहीर केले आहे. टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती आल्याचे सांगितले जात आहे.

‘आदिपुरुष’ सिनेमातील रावणाची भूमिका, हनुमानाच्या भूमिकेकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. परंतु, सिनेमामध्ये रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखा बघून कॉन्ट्रोव्हर्सीला सुरुवात झाली आहे. तसेच हा सिनेमा अतिभव्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा बघताना चाहते मात्र नाराज झाले असल्याचे दिसून येत आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube