‘Baipan Bhaari Deva’ सिनेमाबद्दल केदार शिंदे यांचे मोठे भाष्य; म्हणाले…

‘Baipan Bhaari Deva’ सिनेमाबद्दल केदार शिंदे यांचे मोठे भाष्य; म्हणाले…

kedar shinde post: ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (box office) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरील (Social media) पोस्टच्या प्रेक्षक आणि सेलिब्रिटी (celebrity) या सिनेमाचं जोरदार कौतुक करत आहेत.

दिग्दर्शक केदार शिंदे ( kedar shinde) यांच्या ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलंच प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने १० दिवसात २६ कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा (Cinema) मराठी सिनेमासृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. या सिनेमाचे अनेक किस्से सध्या केदार शिंदे शेअर करत असताना दिसून येत आहेत.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाच्या गीताकारविषयी एक मोठे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सिनेमाचे नाव आणि शेवट वेगळा होता, याबद्दल भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)


#baipanbhaarideva हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं “मंगळागौर”. ते बदलण्याचा विचार जेव्हा आला तेव्हा, #ajitbhure यांनी सुचवलं की, गाण्याची catch line जी आहे ती ठेवली तर? #बाईपणभारीदेवा याचं credit पुर्ण @valaymulgund या गीतकाराचं आहे. ते गाणं त्याने फारच अप्रतिम लिहिलं आहे. स्त्री केंद्रस्थानी ठेवून तीच्या भावभावना उत्तम मांडल्या आहेत. आणि ती शेवटची कविता!!! माझी मैत्रीण @ashwinithepoem त्यावेळी मदतीला धावून आली. या सिनेमाचा शेवट वेगळा होता. पण मंगळागौर गाणं संपल्यावर एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कुठला सीन करणं जड जाणार होतं. ही कवितेची आयडिया डोक्यात आली. संपुर्ण सिनेमाचा सार व्यक्त करणारी ती कविता अश्विनीने लिहिली. या प्रवासात असंख्य माणसं महत्वाची ठरली. कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने १० दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला कमावला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत दिसून आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube