Ketaki Chitale : युती सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केतकी संतापली, व्हिडिओमध्ये ढसाढसा रडली अभिनेत्री

Ketaki Chitale : युती सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केतकी संतापली, व्हिडिओमध्ये ढसाढसा रडली अभिनेत्री

Ketki Chitale Angry on BJP Mahayuti : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत येत असते. शरद पवारांवरील एक पोस्ट केवळ शेअर केल्यामुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही केतकीने तिची वक्तव्यं सुरुच ठेवली आणि ती पुन्हा चर्चेत येत गेली. दरम्यान आता तिने थेट महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हाला आता हिंदूंचीही मते नको का असा प्रश्न तिने केला आहे. वक्फ बोर्डाविषयी (Central Waqf Council) राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर तिने खोचक टीका देखील केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)


केतकी चितळेने इंस्टाग्रामवर स्वतःचा व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले आहे. त्यामुळे काय बोलावं काही देखील कळत नाहीय. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही. त्यांच्या बळकटीकरणासाठी तुम्ही त्यांना 10 कोटी रूपये दिले आहेत. तुम्ही बधीर आहात, की आम्हाला बधीर करत आहात? मी नेहमी म्हणत होते, लोकसभेत कोणाला मत द्यायचंय ते ठरलेलं आहे. त्यात काही प्रश्न नव्हता. मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे.

तुम्हाला मी अगोदरपासून सांगत होते पण तुम्ही तर आता माझं मत तुम्ही खरं करून दाखवणार आहे. देशात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. वक्फ बोर्डाला खारीज करा आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रूपये देत आहात. अगोदरच तीन तिघाडी सरकार आहे तुमचं. तुम्ही ठरवलं आहे का, की हिंदु तुमच्या बाजूला नकोयत, म्हणणं काय आहे तुमचं? अगोदरच तीन तिघाडी सरकार आहे.

Video Viral : ढोल पथकातील महिलेचा व्हिडीओ व्हायरल; मात्र नेटकऱ्यांनी धरले धारेवर

एक परत आपल्या काकाकडे जाणार आणि म्हणणार काका मला माफ करा, मला परत घ्या, दुसरी व्यक्ती म्हणते तीन चाकी सायकल चालवता येत नाहीये. त्यामुळे मी पुन्हा एकदा तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो, असं म्हणणार आहे, तर तिसरा माझा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, माझा राजीनामा घ्या, म्हणून तुम्ही हा दरीद्रीपणा करणार आहेत का? असा प्रश्न देखील केतकीने उपस्थित केला आहे. या व्हिडीओमधून तिने राज्य सरकारसह अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर कडक शब्दात हल्लाबोल केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज