‘खालिद का शिवाजी’च्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घाला, राज्य सरकारचं थेट केंद्राला पत्र

Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ (Khalid Ka Shivaji) हा चित्रपट येत्या ८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, परंतु त्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. तर हिंदू महासंघाने (Hindu Mahasangh) चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली. दरम्यान, आता या चित्रपटाबाबत राज्य सरकारने एक पत्र केंद्राला पत्र पाठवलं आहे. या पत्रात राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती करण्यात आली.
उत्तराखंडमध्ये अडकलेले मराठवाड्यातील २९ यात्रेकरू सुखरूप, जिल्हा प्रशासनाने दिली माहिती
चित्रपटाविरुद्ध निदर्शने
हिंदू संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला असून, सिनेमावर बंदी घालण्यात यावी, अशी मागण केली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य पुरस्कार सोहळ्यात ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाविरुद्ध निदर्शने झाली होती आणि हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, अशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती राज्य सरकारने या पत्रात व्यक्त केली आहे.
Mumbai Crime: क्रिकेट प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक
सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांना हे पत्र लिहिले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रालयाने थेट हस्तक्षेप करावा करण्याची मागणी केली आहे.
चित्रपट प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घालावी…
या पत्रामध्ये म्हटलंय की, हा चित्रपट येत्या आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, राज्य पुरस्कार समारंभात या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने झाली होती, त्यामुळे कायदा स्वव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती या पत्रातून व्यक्त करण्यात आली. तसेच केंद्रीय मंत्रालयानं हस्तक्षेप करत चित्रपटाचे प्रदर्शन तात्पुरते थांबवावे, अशी शिफारसही करण्यात आली आहे.
कशावरून होतोय वाद?
राज मोरे दिग्दर्शित ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट ८ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के सैनिक मुसलमान होते आणि त्यांचे ११ अंगरक्षकही मुसलमान होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम सैनिकांसाठी रायगडावर मशीद बांधली होती, असे संवाद देखील चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटाला हिंदू महासंघाने विरोध केला आहे. चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप हिंदू महासंघानं केला आहे.