अभिनेता किरण माने आयसीयूमध्ये, आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं! म्हणत, केली पोस्ट
Kiran Mane in ICU Post on Social Media : नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्य आणि सोशल मीडियावरील ( Social Media) पोस्टमुळे चर्चेत असलेले अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सध्या ते आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहेत.
संसदेत अनुराग ठाकूर यांनी काढली जात अन् राहुल गांधी भडकले, म्हणाले, माझ्यावर …
याबद्दल स्वतः किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त आणि हसत खेळत होतो. आज आयसीयूमध्ये सलाईन, इंजेक्शन, गोळ्या, तपासण्या आणि प्रचंड असह्य वेदना, आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं. अर्थात यावरही मात करून मी यातून बाहेर पडेल फिकीर नॉट’. असं म्हणत माने यांनी आपल्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.
Wayanad landslides: आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता ! अतिवृष्टीमुळे मदतकार्यात अडथळे
दरम्यान ‘’बिग बॉस’ फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने सोशल मीडियावरही कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.