लक्ष्मी घेऊन आली विद्येला सरस्वतीच्या दारात, हर्षदा खानविलकरकडून सांगलीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

Harshada Khanwilkar या "लक्ष्मी निवास" या मालिकेतील ‘लक्ष्मी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सांगलीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले

Harshada Khanwilkar

Lakshmi brought knowledge to Saraswati’s doorstep, Harshada Khanwilkar distributed notebooks to students in Sangli : मराठी प्रेक्षकांच्या लाडकी झी मराठी आणि त्या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “लक्ष्मी निवास” या मालिकेतील ‘लक्ष्मी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर, ज्यांना प्रेमाने ‘इंडस्ट्रीची मम्मा’ म्हणूनही ओळखले जात, ती आज लहान मुलांची पण ‘मम्मा‘ झाली, याचं कारणही असंच विशेष आहे. हर्षदा खानविलकर यांनी नुकतंच एका विशेष उपक्रमाद्वारे हे दाखवून दिल आहे. हर्षदा मालिकेत ‘लक्ष्मी’ एक अशी आई साकारत आहे, जी आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी झटते आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेते आहे. या मालिकेची संपूर्ण टीम हल्लीच “चला हवा येऊ द्या” च्या एका विशेष भागात सहभागी झाली होती. या मंचावर अनेक किस्से सांगितले गेले.

मी पक्षाची शिस्त मोडलेली नाही; रुपाली ठोंबरे यांचा पक्षाला खुलासा, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का ?

हर्षदा खानविलकरने आपल्या आयुष्यातील काही खणखणीत अनुभवही शेअर केले. त्याचवेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकर यांनी त्यांच्या या आईसारख्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत त्यांची “तुळा” केली ज्यातून गरजू मुलांना वह्या पुस्तक दान केली जाणार होती. या गोष्टीने हर्षदा खानविलकर यांना आश्चर्यचकित केले. यात तराजूच्या एक बाजूवर हर्षदा खानविलकर बसल्या, तर दुसऱ्या बाजूवर वह्या पुस्तकं ठेवली गेली. केवळ त्या क्षणी हे काम संपले नाही. हर्षदा खानविलकर यांनी स्वतः संकल्प केला की ती पुस्तके त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. त्यासाठी हीच वह्या पुस्तके घेऊन त्या स्वतः पोहचल्या सांगलीला श्री दत्त विद्यामंदिर, नरसोबाची वाडी, येथे आणि येथील गरजू शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या भेट म्हणून दिल्या.

Ahilyanagar Election Observers : अहिल्यानगर जिल्ह्यात चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

या अनुभवाबद्दल हर्षदा खानविलकर म्हणतात – “आयुष्यात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्या आत्मिक आनंद देतात कारण त्या अनपेक्षित असतात. हे वर्ष माझ्यासाठी अशाच आनंदाचे वर्ष आहे आणि याचे कारण आहे आपली झी मराठी. २०२५ च्या सुरुवातीला आमची मालिका “लक्ष्मी निवास” प्रक्षेपित झाली, ज्यात मी माझ्या मागील भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका साकारतेय आणि त्यासाठी मिळालेल प्रेम प्रचंड आहे. याव्यतिरिक्त आम्ही “चला हवा येऊ द्याचा विशेष भाग शूट केला होता. जिथे माझी तुळा करून गरजू मुलांना पुस्तकदान केले जाणार होते. पहिल्यांदा मला वाटलं की हे एक प्रॅन्क असेल कारण आम्ही ‘चला हवा येऊ द्या‘ च्या सेटवर होतो आणि तिथे प्रॅन्क होतात, पण नाही हे खरं होतं आणि माझी तुळा केली गेली.

अजित पवार, मुंडेवर पांघरूण घालणं थांबवा, हत्येच्या कटप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे; जरांगेंची फडणवीसांकडे मागणी

मला वाटलं कि आता ती वह्या पुस्तक शाळेतील मुलांपर्यंत पोहचवली जातील. पण नाही मला ती सुखद संधी दिली गेली आणि मला ही संधी दिल्याबद्दल झी मराठीचे खूप खूप आभार, कारण यात सर्वात विशेष गोष्ट होती ती म्हणजे ही वह्या पुस्तकं मलाच मुलांपर्यंत पोहोचवायची होती आणि हे फक्त आणि फक्त झी मराठी शक्य करू शकते. त्यांची मी आभारी आहे की त्यांनी मला अशा नेक कामाचा भाग बनवलं. मला मुलांबरोबर, त्यांच्या पालकांबरोबर, शिक्षकांसोबत वेळ घालवता आला. मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि हसू पाहून मन भरून आलं. या पूर्वीदेखील झी मराठीने ‘कमळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने गरजू मुलींसाठी सायकल वाटप केलं होत. मी खरंच धन्य आहे की मला अशा चॅनेलसोबत काम करण्याची संधी मिळाली जे सामाजिक बदल घडवण्याचं नेतृत्व हातात घेतात. आम्ही फक्त आमच्या कथा सांगत नाहीये, पण अशा प्रभावी उपक्रमांद्वारे बदल घडवत आहोत याचा आनंद आहे.”

follow us