माधुरी दीक्षितचं आई स्नेहलतासोबत होतं मैत्रिणीसारखं नातं
मुंबई : आज बॉलिवूडची (Bollywood)धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit)परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. माधुरीच्या आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit)यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आजच वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. माधुरीसाठी तिची आई एक जिवलग मैत्रिण होती. तिच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तिला आई स्नेहलता यांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळं आईच्या निधनानं (Madhuri Dixit Mother Death) माधुरीच्या आयुष्यामध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
स्नेहलता यांच्या निधनानं माधुरी दीक्षित आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माधुरी आपल्या आईच्या खूपच जवळ होत्या. माधुरीच्या कठिण काळात स्नेहलता यांनी तिला खूप साथ दिली. माधुरीची आई तिची खूप जवळची मैत्रिण होती. आईच्या अशा अचानक जाण्यानं माधुरीला मोठा धक्का बसला आहे.
बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याने आसाम विधानसभेत गदारोळ; चूक लक्षात येताच मागितली माफी
माधुरी आणि तीची आई स्नेहलता यांच्या दोघींचं अनोखं नातं होतं. त्या दोघी मायलेकी असल्या तरी त्या दोघी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी असल्यासारख्या राहात होत्या. आई स्नेहलता यांनी माधुरीच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तीला साथ दिली. त्यामुळं आता आई स्नेहलताच्या जाण्यानं माधुरीच्या आयुष्यात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
आता माधुरीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधुरी दीक्षितनं आजपर्यंत मिळवलेल्या यशात तिच्या आई स्नेहलता यांचा मोलाचा वाटा असल्याचं पाहायला मिळालं. माधुरीला तिच्या आईबद्दल बोलताना कायमच भावूक होताना पाहायला मिळाल्या.
स्नेहलता दीक्षित या स्वतः चांगल्या गायिका होत्या. त्या भेंडीबाजार घराण्याच्या गायिका होत्या. त्या दोघी मायलेकींनी गुलाब गॅंग चित्रपटात एकाच गाण्याला माधुरीसोबत आवाज दिला होता. माधुरीसाठी तिची आई स्नेहलता सर्वकाही होत्या.