Gufi Paintal: महाभारतात ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचे निधन
Gufi Paintal Passed Away: महाभारतातील ((Mahabharata) )शकुनी मामाची (Shakuni Mama) भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सकाळी (सोमवारी) निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पेंटल गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई अंधेरी येथील रुग्णालयात दाखल होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचा सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गूफी पेंटल यांची महाभारतातील शकूनी मामाची भूमिका प्रचंड गाजली होती. शकूनी मामा म्हणजेच गूफी पेंटल असे चित्र त्यावेळी निर्माण झाले आहे. महाभारतानंतर पेंटल यांनी अनेक सिनेमा आणि सीरियल्समध्ये काम केले आहे. पण शकूनी मामा हीच त्यांची ओळख कायम राहिली होती. लोकांना अजून देखील त्यांचं खरं नाव माहीत नाही. त्यांना आज देखील शकूनी मामा म्हणूनच ओळखले जाते. गूफी पेंटल यांची प्रकृती खराब झाल्यावर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली
पेंटल यांनी सीरिअल्स शिवाय सुहाग, दावा, देश परदेस, घूम आदी सिनेमातही काम केले आहे. त्यांनी मोठ्या पडद्यावर वडिलांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पेंटल यांनी काही सिनेमांची निर्मिती देखील केली होती. 1993 मध्ये त्यांची पत्नी पेखा पेंटल यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते एकाकी पडले होते. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी सिनेमा आणि सिरीयलमध्ये काम सुरू ठेवले होते.