Malayalam Actor Mamukkoya Passes Away: मल्याळम अभिनेता मामुकोया यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेताल अखेचा श्वास

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T153233.725

Malayalam Actor Mamukkoya: मल्याळी अभिनेते मामुकोया यांचे निधन (Malayalam Actor Mamukkoya Passes Away) झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. केरळ (Kerala) राज्यातील कोझिकोड (Kozhikode) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मामूकोया (Mamukkoya) यांनी मल्याली भाषेत चौफेर अभिनय केले आहेत. खास करुन त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार मामुकोया हे फुटबॉल मैदानावर चाहत्यांसोबत सेल्फी घेत होते. दरम्यान, चाहत्यांची गर्दी वाढल्याने ते मैदानावर कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. त्यातच त्यांना मेंदूतील रक्तस्रावासह हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हॉस्पिटलमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनकच होत गेली. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मामुकोया यांनी मामूट्टी, जयराम आणि मोहनलाल यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर अभिनय केला आहे. असे असले तरी ते, सामान्य माणसाच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखले जात असत. मामूकोया यांनी ४५० पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केले आहे.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

मामुकोया अनेक दशके मल्याळम विनोदी आणि नाटकांमध्ये सतत सक्रीय होते. त्यांनी १९७९ मध्ये थिएटरमधून कारकिर्दीला सुरुवात केली होती. नंतर ते सिनेमामध्ये विनोदी अभिनयास सुरुवात केली होती. त्यांनी उच्चारलेल्या मलबार बोलीने त्यांना दक्षिण भारतीय सिनेमामध्ये एक प्रिय व्यक्ती बनवले होते.

 

Tags

follow us