कोर्टात गेले, सरकारसोबत पंगा घेतला…अन् खटला जिंकले, पाकिस्तानातून भारतात आलेल्या ‘भारत कुमार’ची इनसाईड स्टोरी

कोर्टात गेले, सरकारसोबत पंगा घेतला…अन् खटला जिंकले,  पाकिस्तानातून भारतात आलेल्या ‘भारत कुमार’ची इनसाईड स्टोरी

Manoj Kumar Won Case Against Indian Goverment : बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड गेलाय. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळापासून ते आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात (Bollywood News) आलेलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मनोज कुमार यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झालीय. यानिमित्ताने त्यांचा एक खास किस्सा आठवतोय.

मनोजकुमार हे भारतातील एकमेव चित्रपट निर्माता असल्याचं म्हटलं जातं, ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला. त्यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असलं तरी त्यांनी बॉलीवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख (Manoj Kumar Passed Away) बनवली. मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले.

BIMSTEC म्हणजे काय? भारताला किती फायदा.. बँकॉक समिटला PM मोदींचीही हजेरी

मनोज कुमार यांच्या ‘दस नंबरी’ या चित्रपटावर प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली होती. त्यानंतर ‘शोर’ हा चित्रपटसुद्धा अशाच प्रकारच्या घटनेला सामोरा गेला. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मनोज कुमार होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो दूरदर्शनवर दाखवण्यात आला, त्यामुळे थिएटरमध्ये कमाई न झाल्याने त्यांचं मोठं. नुकसान झालं होतं. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतलं. अनेक आठवडे ही पायपीट केली अन् अखेर कोर्टाने मनोज कुमार यांच्या बाजूने निकाल दिला. भारत सरकारविरोधात खटला जिंकणारे ते एकमेव कलाकार होते. ही घटना आणीबाणीच्या काळातच घडली होती.

मनोज कुमार यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील अॅबटाबाद येथे 1937 साली एका पंजाबी हिंदू ब्राम्हण कुटुंबात झालेला. फाळणीनंतर मनोज कुमार 10 वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब जंदियाला शेरखान इशून दिल्लीला स्थलांतरीत झालं. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे. असं म्हटलं जातं की, भगतसिंगांचा मनोजकुमार यांच्यावर खूप प्रभाव आहे. त्यांनी ‘शहीद’ सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले. त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचं तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केलं होतं.

आई-बाबा मुलांसाठी फक्त 21 मिनिटे द्या! पॅरेंटिंगचा 7-7-7 ट्रेंड काय सांगतो?

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले अन् गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट करणारे मनोज कुमार त्यांच्या तत्त्वांवर ठाम होते. मोठ्या पडद्यावर त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या होत्या. आपल्या चित्रपटांद्वारे त्यांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. देशभक्तीपर चित्रपट बनवणारे ते पहिले बॉलिवूड अभिनेते बनले. मनोजकुमार यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. लेट्सअप मराठीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube