‘Sari’ Movie Review : शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवणार कथानक

‘Sari’ Movie Review : शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवणार कथानक

प्रेरणा जंगम

Sari Movie Review: प्रेमाची उत्कंठा वाढवणारी कहाणी सरी (Sari Movie) या सिनेमात पाहायला मिळत आहे. के. एस. अशोक यांनी या सिनेमाचे लेखन– दिग्दर्शन केले आहेत. कन्नड चित्रपट (Kannada movies) ‘दिया’साठी त्यांची ओळख आहे. त्यानंतर त्याचा डियर दिया हा हिंदी रिमेकही (Hindi remake) बनला होता. हेच कथानक आता सरी या मराठी चित्रपटात पाहायला मिळतय. प्रेमाशी संबंधीत भावनीक कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

पहिलं प्रेम, त्याची जाणीव आणि त्यानंतर आयुष्यात आलेलं दुसरं प्रेम या सगळ्याचा गुंता या चित्रपटात उत्कंठावर्धक वळण घेऊन येतं. अभिनेत्री रितीका श्रोत्री (Actress Ritika Shrotri), अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारतायत. ज्यात रितीका ही दियाच्या भूमिकेत झळकणार आहे. अजिंक्य हा रोहितच्या तर पृथ्वी आदीच्या भूमिकेत दिसतोय. तर हा प्रेमाचा त्रिकोण आहे की काय ? याचं उत्तर चित्रपटात मिळेल.

एका महत्त्वाच्या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते ती थेट जुन्या आठवणी आणि त्या प्रसंगाचा गुंता पाहायला मिळतो. दिया ही कॉलेज काळात रोहितच्या प्रेमात पडते. मात्र रोहितजवळ ती प्रेमाची कबुली देत नाही. काही वर्षांनी दियाला रोहित पुन्हा भेटतो. आणि त्यानंतर दोघाची मैत्री होते आणि या मैत्रीतून प्रेम फुलतं. मात्र दोघांच्या आयुष्यात असा काही दुखद क्षण येतो ज्यामुळे दोघांचं आयुष्य उध्वस्त होतं. तो क्षण नेमका काय आहे? आणि त्याने सगळं कसं बदलतं हे चित्रपटातच पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासगळ्यात दियाच्या आयुष्यात आदी नावाचा मुलगा येतो त्याच्यासोबत दियाचं काय नातं असतं आणि कथानकाला काय वळणं मिळतं हे पाहणं मह्त्त्वाचं ठरतय.

चित्रपटाचं मूळ कथानक रोहित, दिया, आदी आणि त्याची आई यांच्याभोवती फिरणारं आहे. या मूळ पात्रांच्या आयुष्यातील चढ-उतार यात पाहायला मिळतात. चित्रपटाला दिलेला भावनिक पैलू कुठेतरी समरस होण्यात कमी पडलाय. कथा ताकदीची असली तरी त्यांची मांडणी गडबडल्याचं जाणवतं. कथेतील वास्तव नाटकी वाटू लागतं आणि त्यातील सहजता हरवलेली वाटते. चित्रपटातील गाणी, संगीत, संवाद आणि छायांकन याबाबतीत चित्रपट उजवा ठरला.
चित्रपटातील मुख्य कलाकारांचं काम छान झाले आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

अभिनेत्री रितिका श्रोत्रीनं दियाच्या भूमिकेतून पैलू उत्तम सादर केले आहेत. भावनिक प्रसंग सादर करण्याचाही उत्तम प्रयत्न दिसोत. तर अभिनेता अजिंक्य राऊतला भूमिकेती कंगोरे सादर करण्याच बराचसा वाव असतानाही ते तितकं प्रभावी वाटत नाही. याउलट आदीच्या भूमिकेत पृथ्वी अंबर भाव खाऊन जातो. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी देखील आईच्या भूमिकेत लक्ष वेधून घेतात. चित्रपटाचं कथानक शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं आहे. त्यामुळे या चित्रपटाचा अनुभव उत्कंठावर्धक असल्याने हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube