Antarpat मालिकेचा अद्वितीय महासप्ताह; गौतमी -क्षितिजच्या लग्नाची प्रेक्षकांना उत्सुकता

Antarpat मालिकेचा अद्वितीय महासप्ताह;  गौतमी -क्षितिजच्या लग्नाची प्रेक्षकांना उत्सुकता

Marathi Serial Antarpat Gautami Kshitij Marriage : कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका (Marathi Serial) ‘अंतरपाट’ (Antarpat) ही चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रसिकवर्ग नव्या मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत. तुम्ही मालिकेत पाहू शकता की , रश्मी अनपट आणि अशोक धगे म्हणजेच आपले गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार असून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.

अरविंद केजरीवालांना न्यायालयाचा दणका, 3 जुलैपर्यंत वाढला ‘तिहार’मधील मुक्काम

गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे. काही दिवसांआधी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गौतमी आणि तिच्या परिवाराने बाप्पाच्या चरणी पत्रिका अर्पण केली. त्यानंतर त्या दोघांचे केळवण अगदी छान पारंपरिक पद्धतीने थाटामाटात पार पडले.

… म्हणून राशी खन्नाने Aranmanai 4 स्क्रिप्ट न पाहताच केला होता साइन

या सगळ्यानंतर महत्वाचा क्षण म्हणजे लग्न. लग्न म्हणजे एक संस्कार… आपल्या संस्कृतीचा आरसा म्हणता येईल. असा महत्वाचा विधी ज्यामध्ये विविध पद्धतीच्या विधी आणि त्यातून झळकणारे वेगळेपण आपल्याला दिसत असते. पण आजकालच्या चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार, या सगळ्या गर्दीमध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव जपणारे  परंपराची उजळणी करून देणारे एक साधे सोज्वळ पण तितकेच सुंदर असे लग्न म्हणजे कलर्स मराठीवरील ‘अंतरपाट’ या मालिकेमधल्या क्षितीज आणि गौतमीचे लग्न.

Anushka Sen : अनुष्का सेनच्या मादक अदा पाहून चाहते झाले घायाळ

गौतमी- क्षितिज यांचा विवाह विधी एखाद्या हॉलमध्ये न करता अत्यंत सुंदर वेगळेपणा देणाऱ्या वाड्यात पार पडणार आहे. या वाड्यात झगमगती रोषणाई आणि सजावट न करता महाराष्ट्रीय संस्कृतीत महत्वाचे मानले जाणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजावट केली आहे. या शिवाय रांगोळी, फुलांची सजावट तसेच मराठमोळी संस्कृतीची ओळख असलेले आभूषण आणि येणाऱ्या पाहुण्यांना कोकणचा आनंद मिळावा, म्हणून वेलकम ड्रिंकमध्ये कोकणी शहाळ्याचे पाणी , कोकम सरबत आणि पन्हं दिले आहे.

त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्यांना मोदक ते देखील अस्सल तुपाची धार सोडून देणार. शिवाय हे सगळे जेवण केळीच्या पानात दिले जाणारे आहे आणि या सगळ्यात ऐकायला येतील मराठी लोककलेची लोकगीते जी प्रत्यक्षात लोककलाकार सादर करतील. म्हणजे केवळ बघण्यातच नाही तर ऐकण्यात सुद्धा पारंपारिक वैभव झळकत आहे. आजच्या ट्रेडिंगच्या काळात महाराष्ट्राची परंपरा सांगणारी ‘अंतरपाट’ या मालिकेतील गौतमी – क्षितिज यांचा लग्न सोहळा पाहायला विसरू नका..!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज