Me Nathuram Godse Boltoy: सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार नथुराम गोडसेची मुख्य भूमिका!
Me Nathuram Godse Boltoy Marathi Play: गेल्या काही वर्षांपासून मराठी रंगभूमीवर वादग्रस्त ठरलेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा एकदा रंगभूमीवर नव्याने येत आहे. (Social media) एकाच वेळी येऊ घातलेल्या या दोन नाटकांमुळे ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असे चित्र रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. यावरून वादाचे प्रयोग रंगण्यास सुरुवात झाली आहे.
याअगोदर मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे माऊली प्रॉडक्शनचे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. तर, दुसरीकडे आधी या नाटकामध्ये ‘नथुराम’च्या मुख्य भूमिकेत दिसलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडेसे बोलतोय’ हे नवे नाटक घेऊन येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाटकाचे शीर्षक जवळपास एकसारखे असल्याने त्यावरून न्यायालयीमध्ये सध्या लढाई सुरु झाली आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी पोंक्षे यांना ७२ तासांचा कालावधी दिला आहे. जर त्यांनी माघार घेतली नाही, तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी सुरू केली आहे.
ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १० जुलै १९९८ दिवशी माऊली प्रॉडक्शनतर्फे मराठी रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केल्याचे बघायला मिळाले होते. शरद पोंक्षे यांनी त्यामध्ये नथुरामची मुख्य भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका देखील चांगलीच लोकप्रिय ठरली होती. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक जोरदार चर्चेत आला आहे.
Vivek Oberoi: प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण?
या नाटकाचे ८१६ प्रयोग झाल्यावर २०१६ मध्ये निर्माते धुरत यांनी हे नाटक थांबवण्याचा निर्णय हाती घेतला होता. आता नाट्यनिर्माते धुरत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा एकदा घेऊन येत आहे. विवेक आपटे याचे दिग्दर्शन करत आहेत, तसेच त्याच्या तालमी ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. या नाटकामध्ये ‘नथुराम’च्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले चाहत्यांना बघायला मिळणार आहे. ‘नथुराम’च्या भूमिकेत कलाकाराचे नाव निश्चित झाल्यावर आता नाटकाच्या तालीम सुरू होणार आहे.
नोव्हेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे दिग्दर्शक विवेक आपटे यांनी यावेळी सांगितले आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नव्याने पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असताना ‘नथुराम’च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याबद्दल मोठी उत्सुकता लागली होती. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड करण्यात आली आहे. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार आहे? याकडे सर्वांचेच लक्ष वेधून लागले आहे.