Mitali Mayekar: सिद्धार्थ- मिताली आईबाबा होणार? अभिनेत्रीची ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
Mitali Mayekar shared post: मराठी सिनेइंडस्ट्रीतील गोड कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) कायम त्यांच्या रोमँटिक फोटोंमुळे जोरदार चर्चेत येत असतात. दोघंही गेल्या काही दिवसांपूर्वी युरोप ट्रिपला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. पॅरिसच्या आयफेल टॉवरवरील त्यांच्या रोमँटिक फोटोने संपूर्ण सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले होते.
तसेच मितालीच्या बिकीनीतील मधील फोटोने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळालं. तर आता या गॉड कपल लवकरच गुडन्यूज देणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरु झाल्याचे दिसत आहे. याचं कारण म्हणजे मितालीने पोस्ट केलेला नवा फोटो आणि त्याखाली लिहिलेलं कॅप्शनने सर्वांचं याबद्दल संशय आला आहे.
View this post on Instagram
मिताली कायम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोशूटने ती चाहत्यांना सतत घायाळ करत असते. तसेच ती फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तर मितालीने गेल्या काही तासांपूर्वी एक फोटो पोस्ट केला आहे. काळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये ती एकदम हटके अंदाजात दिसत आहे. तसेच कुरळे केस आणि थोडा मेकअप यामुळे तिचं सौंदर्य अगदी फुलून आले आहे. एका बेंचवर बसून तिने हा फोटो काढला आहे. परंतु या फोटोला दिलेलं कॅप्शन फारच इंटरेस्टिंग आणि चाहत्यांना संभ्रमात टाकणारं आहे. ‘मॉमी इज गेटिंग हॉट’ असं या फोटोला तिने कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळत आहे.
मितालीने हा फोटो आणि कॅप्शन पोस्ट करताच याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. ‘म्हणजे तुझं काय म्हणणंय की तू प्रेग्नंट आहेस?’ अशी कमेंट चाहते करत असल्याचे दिसत आहे. अर्थात मितालीने अद्याप कोणतीही थेट घोषणा केली नाही. परंतु या पोस्टमधून तिने चाहत्यांना नेमकं कशाबद्दल हिंट दिली याची चर्चा सध्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Ashok Saraf : कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सराफ कुटुंबाने केला रंगकर्मींचा गौरव
मिताली आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. २४ जानेवारी २०११ दिवशी पुण्याच्या ढेपेवाड्यात दोघांनी अगदी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा अल्बम, व्हिडिओ, फोटो खूप व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच लग्नापूर्वी दोघंही काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत स्वत:चं घर घेतल्याची बातमी या जोडप्यांनी दिली होती. आता कुटुंबामध्ये तिसऱ्या पाहुण्याचं आगमन होणार का? याबद्दल मिताली आणि सिद्धार्थ कधी खुलासा करणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.