Naach Ga Ghuma : तिसरं महायुद्ध कामवाल्या बायकांच्या टंचाईमुळे? स्वप्नीलच्या ‘नाच गं घुमा’ चा टीझर आउट!

Naach Ga Ghuma : तिसरं महायुद्ध कामवाल्या बायकांच्या टंचाईमुळे? स्वप्नीलच्या ‘नाच गं घुमा’ चा टीझर आउट!

Naach Ga Ghuma Films Teaser Out : अभिनेता स्वप्नील जोशीने ( Swapnil Joshi ) निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टीझर ( Teaser Out ) प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ‘जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते कामवाल्या बायकांच्या टंचाई मुळे होईल.’ असं म्हणत ‘नाच गं घुमा’ ( Naach Ga Ghuma ) चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा पहिला चित्रपट 1 मे 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयाच्या सोबतीने निर्मिती विश्वात स्वप्नीलच पदार्पण नक्कीच खास ठरणार यात शंका नाही.

Loksabha Election : भाजपने CM एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडूंचे टीकास्त्र

बायकांची फौज असलेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची मन जिंकली तर आहेत. आता त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता आहे. स्वप्नील या चित्रपटात अभिनेता म्हणून दिसणार का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Earthquake नंतर तैवान आगीतून फुफाट्यात; 30 लढावू विमानं पाठवत चीनची घुसखोरी

निर्मिती प्रवासाबद्दल स्वप्नील म्हणतो, 2024 मधला माझा पहिला निर्मिती असलेला हा चित्रपट असून उत्सुकता तर खूप आहे पण आपल्या मैत्रिणी सोबत काम करण्याची मज्जा मस्ती आणि खूप सारे अनुभव या निमित्ताने घेता आले. 1 मे ला माझी निर्मिती असलेला ” नाच गं घुमा” रिलीज होणार असून हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. निर्मिती करणं सोप्पं नसतं हे तितकच खरं आहे आणि म्हणून अनेक आव्हानं असूनही निर्मिती विश्व माझ्यासाठी खास आहे”

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीत स्त्री प्रधान सिनेमाची मोठ्या प्रमाणत निर्मिती झाली. मराठीमध्ये हलके-फुलके पण अनेक वेगवेगळे विचार करायला भाग पाडणारे सिनेमा बनवण्याची संख्या सध्या वाढली आहे. (Marathi Movie) ‘झिम्मा 2’, ‘बाई पण भारी देवा’ सारख्या मराठी सिनेमांनी चाहत्यांना हसवलही पण गंभीर विचार करायला भाग देखील पाडले आहे. (Social Media) आता अशाच स्त्रियांच्या अनेक वेगवेगळ्या विषयावर संबंधित नाच गं घुमा हा नवा सिनेमा चाहत्यांना भेटीला येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज