Gadkari Teaser Out : ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ चा जीवनपट उलगडणार; ‘गडकरी’ चा टीझर रिलीज

Gadkari Teaser Out : ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ चा जीवनपट उलगडणार; ‘गडकरी’ चा टीझर रिलीज

Gadkari Teaser Out : नितीन गडकरी… (Nitin Gadkari) देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव आणि महाराष्ट्राचे लाडके नेते. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ (Highway Man of India) अशी त्यांची ख्याती आहे. देशाच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ (Gadkari Marathi Movies) हा रंजक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमाचा टीझर (Gadkari Teaser Out) सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

गडकरींची भूमिका कोण साकारणार?

नितीन गडकरी यांच्या आयुष्यावरील गडकरी या चित्रपटाचा टीझर जरी प्रदर्शित झाला असला तरी देखील या चित्रपटामध्ये नितीन गडकरींची मुख्य भूमिका कोण साकारणार आहे? या मुख्य भूमिकेत नेमकं कोण बघायला मिळणार आहे. याची उत्सुकता कायम आहे. कारण या टीझरमध्ये चित्रपटाच्या नायकाचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. मात्र संवाद ऐकायला मिळत आहेत. जो आवाज हुबेहुब नितीन गडकरींच्या आवाजासारखा आहे.

Big Boss मध्ये दिसणार ‘हे’ रिअल लाईफ पॉवर कपल

नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. टीझरची सुरुवातच ”या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” या ओळीने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टिझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 3 डिसेंबरला येणार निकाल

अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या सिनेमाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. तर प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना 27ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube