Baplyok: दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा ‘बापल्योक’ सिनेमाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
Nagraj Manjule Baplyok : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) या मराठी सिनेमाचे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.
या नव्या गाण्याचे बोल ‘उमगाया बाप रं…’ असे आहे. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे.. (Nagraj Manjule Baplyok Marathi Movie New Song Out)
View this post on Instagram
‘बापल्योक’ या सिनेमामध्ये बाप लेकाची एक हलकाफुलका प्रवास पाहायला मिळणार आहे. या सिनेमाद्वारे बाप आणि लेकाचा भावनिक विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामध्ये एक चौकोनी कुटुंब बघायला मिळणार आहे. यामध्ये एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण बघायला मिळत आहे. यामध्ये ते सर्वजण त्या मुलाकडे कौतुकाने बघत असल्याचे बघत असल्याचे दिसून येत आहे.
चित्रपटात सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने चित्रपटातून मांडला गेला नाही. मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटला. ही गोष्ट मला भावली आणि मी चित्रपटासाठी पुढाकार घेतला.
‘तिरक्या रेघेवरच असतं बापल्योकाचं नातं. ताणलं तर आयुष्यभराचं ताणतं,अन् घावलं तर?…तेच हुडकण्यासाठी आमी समदी एकत्र आलोय’, असं मकरंद माने सांगतात. ‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत.
या सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या सिनेमाची निर्मिती केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. नागराज मंजुळे हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘बापल्योक’ या सिनेमाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने आणि विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. येत्या २५ ऑगस्टला हा सिनेमा चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.